निमा  निवडणुक : नऊ दिवसांत एकच अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 12:24 AM2018-07-10T00:24:19+5:302018-07-10T00:24:33+5:30

नाशिक इंडस्ट्रीज अ‍ॅन्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) च्या द्वैवार्षिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघ्या तीन दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला असताना केवळ एक अर्ज दाखल झाला असून, सहा अर्जांची विक्री झाली आहे. एकता पॅनलचे उमेदवार एकत्रित अर्ज दाखल करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

 Nima elections: One application filed in nine days | निमा  निवडणुक : नऊ दिवसांत एकच अर्ज दाखल

निमा  निवडणुक : नऊ दिवसांत एकच अर्ज दाखल

Next

सातपूर : नाशिक इंडस्ट्रीज अ‍ॅन्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) च्या द्वैवार्षिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघ्या तीन दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला असताना केवळ एक अर्ज दाखल झाला असून, सहा अर्जांची विक्री झाली आहे. एकता पॅनलचे उमेदवार एकत्रित अर्ज दाखल करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
निमा या औद्योगिक संघटनेच्या द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर १ जुलैपासून उमेदवारी अर्ज विक्रीस प्रारंभ करण्यात आला आहे. १२ जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून, २२ रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा दिवस आहे व २९ जुलै रोजी मतदान घेण्यात येणार आहे. निमाच्या घटनेनुसार पहिल्या वर्षी मोठ्या उद्योग घटकासाठी अध्यक्षपद राखीव आहे. तर सरचिटणीस, खजिनदार प्रत्येकी एक पद, उपाध्यक्ष दोन पदे त्यात लघु आणि मोठ्या उद्योग घटकासाठी, सचिव दोन पदे त्यात लघु आणि मोठ्या उद्योग घटकासाठी आणि सिन्नर, दिंडोरी यांसह कार्यकारिणीच्या ३४ अशा ४१ पदांसाठी ही निवडणूक घेण्यात येणार आहे. नऊ दिवसांत सहा अर्जांची विक्री झाली असून, कार्यकरिणीसाठी तरुण अग्रवाल यांचा अर्ज दाखल झाला आहे.  एकता पॅनलच्या माजी अध्यक्षांच्या बैठकीत इच्छुक उमेदवारांची इच्छा जाणून घेण्यात आली आहे. कोण उमेदवार कोणत्या पदासाठी इच्छुक आहे याची माहिती घेण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची नाडी एकता पॅनलच्या समितीच्या हातात आहे. त्यानुसार इच्छुक उमेदवारांकडून वर्णी लागण्यासाठी फिल्डिंग लावण्यात येत आहे. समितीच्या निर्णयानुसार एकता पॅनलचे सर्व उमेदवार एकत्रित अर्ज दाखल करणार आहेत.

Web Title:  Nima elections: One application filed in nine days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.