कमको बॅँक अध्यक्षपदी निंबा कोठावदे राजेंद्र अमृतकार उपाध्यक्षपदी बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 07:35 PM2019-07-09T19:35:49+5:302019-07-09T19:36:40+5:30
कळवण : दि कळवण मर्चंट को आॅप बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक मंगळवारी (दि.९) बँकेच्या सभागृहात संपन्न होवून अध्यक्षपदी प्रा. निंबा कोठावदे तर उपाध्यक्षपदी राजेंद्र अमृतकार यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
कळवण : दि कळवण मर्चंट को आॅप बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक मंगळवारी (दि.९) बँकेच्या सभागृहात संपन्न होवून अध्यक्षपदी प्रा. निंबा कोठावदे तर उपाध्यक्षपदी राजेंद्र अमृतकार यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
दि कळवण मर्चंट को आॅप बँकेचे विद्यमान अध्यक्ष प्रवीण संचेती, उपाध्यक्ष शालिनी महाजन यांनी आवर्तन पध्दतीने राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या अध्यक्षपदावर आचारसंहितेच्या कालावधीत जेष्ठ संचालक योगेश मालपुरे यांची निवड करुन बॅँकेचे कामकाज चालविण्यात आले होते.
त्यानंतर आता सहकार विभागाने कमको अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्र म घोषित केल्याने मंगळवारी (दि.९) संचालक मंडळाची बैठक निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली होेवून त्यात कमको बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड करण्यात आली. अध्यक्षपदाकरिता प्रा निंबा कोठावदे तर उपाध्यक्षपदाकरिता राजेंद्र अमृतकार असे दोघांचेच अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर समर्थक व कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला.
निवडीप्रसंगी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीला बँकेचे विद्यमान अध्यक्ष योगेश मालपुरे, सुनील महाजन, प्रवीण संचेती, पोपटराव बहीरम, नितीन वालखडे, गजानन सोनजे, प्रभाकर विसावे, भारती कोठावदे, शालिनी महाजन उपस्थित होते.
निवडीनंतर सभागृहात नविनर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बाबुराव पाटील, भूषण पगार, सुमन देवरे, राजेंद्र पवार, गजानन सोनजे, संजय मालपुरे, आर. के. महाजन, जितेंद्र कापडणे, के. के. शिंदे, सुभाष देवघरे, राजेंद्र सोनजे, दीपक महाजन, नितीन पाटील, संतोष अहिरराव, गिरीश येवला, अशोक पगार, किशोर अमृतकार, तुषार देवघरे, विनोद मालपुरे, कैलास जाधव, महेंद्र भावसार, मनोज कोठावदे, प्रविण घुगे, सुहास भावसार, स्वप्नील अमृतकार आदी उपस्थित होते.
चौकट
बॅकींग क्षेत्रात स्पर्धात्मक युग असल्याने राष्ट्रीयकृत व खासगी बॅकांनी ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित करु न कामकाज सुरु केल्याने बॅकेशी निगडीत खातेदार आणि ठेवीदार यांना सन्मानपूर्वक वागणूक देतांना ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बॅकेचे आधुनिकीकरण व नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच तेथे कामकाज सुरु करणार आहे.
- प्रा निंबा कोठावदे,
अध्यक्ष, कमको बँक.
कमको बँकेच्या कामकाजात संचालक मंडळ व सदस्य यांना विश्वासात घेऊन कामकाज करणार असून सभासदांच्या अभंग विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, सभासद व खातेदार यांच्या सुचनांचे पालन करु न त्याची अंमलबजावणी केली जाईल.
- राजेंद्र अमृतकार,
उपाध्यक्ष, कमको बॅक.