निमगाव-सिन्नरला दोन गटात धुमश्चक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:18 AM2021-02-27T04:18:22+5:302021-02-27T04:18:22+5:30

सिन्नर : तालुक्याच्या निमगाव-सिन्नर येथे सरपंच व उपसरपंच निवडीप्रसंगी दोन गटात जोरदार धुमश्चक्री होऊन नवनिर्वाचित सदस्यांच्या वाहनाची तोडफोड ...

Nimgaon-Sinnar in two groups | निमगाव-सिन्नरला दोन गटात धुमश्चक्री

निमगाव-सिन्नरला दोन गटात धुमश्चक्री

Next

सिन्नर : तालुक्याच्या निमगाव-सिन्नर येथे सरपंच व उपसरपंच निवडीप्रसंगी दोन गटात जोरदार धुमश्चक्री होऊन नवनिर्वाचित सदस्यांच्या वाहनाची तोडफोड व धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात ६० ते ७० जणांविरोधात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गोंधळात सरपंचपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने सरपंचपद रिक्त राहिले तर समसमान मते मिळाल्याने उपसरपंचपदाची निवड चिठ्ठीद्वारे करण्यात आली.

निमगाव-सिन्नर येथे ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत एका गटाला सात तर दुसऱ्या गटाला चार जागा मिळाल्या होत्या. सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी राखीव होते. मात्र सरपंच व उपसरपंच निवडीसाठी सदस्यांची रस्सीखेच होती. शुक्रवारी (दि.२६) सकाळी ११ ते १ वाजेपर्यंत सरपंच व उपसरपंच निवडीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. या दरम्यान बाहेरगावी गेलेले सदस्य वाहनातून ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात आल्यानंतर जमावाने वाहन अडवून ओढाताण सुरु केली. यात या वाहनाच्या काचा फोडण्यासह गाडीची लाठ्या-काठ्या व दगडाने तोफतोड करण्यात आली. जमाव खूपच आक्रमक झाल्यामुळे पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.

पोलिसांनी जमावावर सौम्य लाठीमार करुन जमाव पांगविण्याचा प्रयत्न केला. यात मोठा गोंधळ उडाला. सदस्यांची ओढाताण होत असल्याचे चित्र दिसून येत होते. निर्धारित वेळेत सरपंचपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. तर उपसरपंच निवड तणावपूर्ण वातावरणात पार पडली. निमगाव-सिन्नर येथे पोलिसांनी गावात मोठा बंदोबस्त तैनात केला असून गावात पोलिसांची गस्त सुरु आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात ६० ते ७० जणांच्या जमावाविरोधात सरकारी कामात अडथळा आणणे, दंगल करणे, धक्काबुक्की करणे असा गुन्हा नोंदविण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी दिली.

इन्फो

गोंधळात सरपंचपद राहिले रिक्त

निमगाव-सिन्नर येथील सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. निवडणूक अधिकारी ज्ञानेश्वर कापसे व ग्रामसेवक प्रवीण उगले यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया सुरु झाली. सरपंचपदाच्या एकमेव उमेदवार चंद्रकला गुंजाळ बैठकीस अनुपस्थित होत्या. तर उपसरपंचपदासाठी चार उमेदवारी अर्ज दाखल झाले. उपसरपंचपदासाठी त्यातून दोघांनी माघार घेतल्याने सुनंदा प्रकाश आव्हाड व शिवाजी रानोबा शेळके यांच्यात निवडणूक झाली. दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी पाच मते मिळाली. त्यामुळे चिठ्ठी काढण्यात आली. सुनंदा आव्हाड यांची चिठ्ठी निघाल्याने त्यांना उपरसरपंचपदी निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य मंगेश सानप, रंजना सानप, वैशाली सानप, दशरथ सानप, जयश्री चंद्रमोरे, शांताराम सानप, श्रीमती नागरे व श्रीमती वणवे उपस्थित होते.

फोटो - २६ निमगाव सिन्नर दंगल

सिन्नर तालुक्यातील निमगाव-सिन्नर येथे सरपंच निवडीप्रसंगी सदस्यांच्या वाहनाची तोडफोड करण्यात येऊन उसळलेली दंगल.

===Photopath===

260221\26nsk_72_26022021_13.jpg

===Caption===

फोटो - २६ निमगाव सिन्नर दंगल  सिन्नर तालुक्यातील निमगाव-सिन्नर येथे सरपंच निवडीप्रसंगी सदस्यांच्या वाहनाची तोडफोड करण्यात येऊन उसळलेली दंगल. 

Web Title: Nimgaon-Sinnar in two groups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.