पाटणेत नऊ बाधित; पाच दिवस गाव बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 10:40 PM2020-07-04T22:40:13+5:302020-07-04T23:15:00+5:30
पाटणे येथे जवळ जवळ ४० रिक्षा असून, गेल्या शंभर दिवसांपासून रिक्षा बंद असल्याने आपली उपजीविका भागविण्यासाठी दुसरा व्यवसाय शोधण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. अशीच अवस्था अनेक व्यावसायिकांची आहे. यातून मार्ग काढायचा असेल तर नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पाटणे : येथे कोरोनाविषाणू बाधित चार रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली असताना. शुक्रवारी पुन्हा पाच रुग्णाचा अहवाल कोरोनाबाधित आल्याने पाटणे येथील ग्रामस्थांनसाठी वाढती बाधिताची संख्या धोक्याची ठरू पहात आहे.
शुक्रवारी प्राप्त झालेल्या अहवालात एक ५४वर्षीय महिला त्यानंतर प्राप्त झालेल्या अहवालात ६० वर्षीय पुरुष, ५५ वर्षीय महिला, ३० वर्षीय महिला आणि २८ वर्षांचा युवक यांचा समावेश आहे. एकूण १७ रुग्णांच्या घशाचे नमुने (स्वॅब) तपासणीसाठी पाठवले असता. त्यातील पाच रुग्ण कोरोनाबाधित आढल्याने पाटणे येथील रुग्णांची संख्या ९ वर पोहोचली आहे.
पाटणे ग्रामपंचायतीच्या वतीने ३ ते ७ जुलैदरम्यान पाच दिवसांसाठी गाव बंद ठेवण्यात आले असून, काल बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्यांनी दिली. पाटणे येथे दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असल्याने बांधित रुग्णांचा संपर्क कोणाकोणाशी झाला त्याची माहिती जमा करून ही सांखळी खंडित करण्याचे आव्हान आरोग्य विभागासमोर आहे.
चांदवडला नवीन तीन रुग्ण
चांदवड शहरातील २६ वर्षीय पुरुष, २८ वर्षीय महिला, ३२ वर्षीय महिला असे तीन जण कोरोनाबाधित रुग्ण आढळले
असल्याची माहिती तहसीलदार प्रदीप पाटील व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पंकज ठाकरे यांनी दिली. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील ५४ वर्षीय पुरु ष व ५१ वर्षीय महिला यांचे अहवाल बुधवारी (दि. १) प्राप्त झाले होते. दोन्हीही अहवाल पॉझिटिव्ह आले होते. सदर पुरु ष कर्मचारी हे एसटी महामंडळ नाशिक कार्यशाळा येथे कार्यरत होते. त्यांचे कुटुंबातील इतर दोन व्यक्ती यांचेसुद्धा नमुने घेतले होते. त्यात २६ वर्षीय मुलगा, २८ वर्षीय मुलगी आहे, तर त्यांच्यावर खासगी ३२ वर्षीय महिला कंपाउण्डरने उपचार केले होते. असे तीन जण आज दि. ३ जुलै रोजी सध्यांकाळी सहा वाजता पॉझिटिव्ह रिपोर्ट आले आहेत. नागरिकांनी आवश्यकता असल्यासच बाहेर पडावे. घाबरून जाऊ नये; परंतु काळजी घ्यावी, असे तहसीलदार पाटील यांनी सांगितले.