सात उमेदवारांचे नऊ अर्ज बाद

By admin | Published: June 27, 2015 12:45 AM2015-06-27T00:45:21+5:302015-06-27T00:47:33+5:30

सात उमेदवारांचे नऊ अर्ज बाद

Nine applications for seven candidates | सात उमेदवारांचे नऊ अर्ज बाद

सात उमेदवारांचे नऊ अर्ज बाद

Next

नाशिक : कृषी उत्पन्न बाजार समिती पंचवार्षिक निवडणुकीत अर्ज छाननीत एकूण सात उमेदवारांचे नऊ अर्ज अवैध ठरविण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मधुमती सरदेसाई यांनी दिली. त्यामुळे बाजार समितीच्या १८ संचालकपदांसाठी १६८ उमेदवार छाननीत पात्र ठरले आहेत. ग्रामपंचायत संवर्गाच्या संचालक पदाच्या चार जागांसाठी असलेल्या सर्वसाधारण गटातून शेतकरी नसल्याचा पुरावा सादर करता न आल्याने राजाराम वामन झगळे तसेच प्रमोद आडके यांचे अर्ज बाद ठरविण्यात आले. तसेच याच संवर्गातील अनुसूचित जाती / जमाती गटातून प्रवीण रामराव लोखंडे, आर्थिक दुर्बल गटातून नीलेश सुभाष पेखळे यांचे अर्जही शेतकरी असल्याचे पुरावे ते सादर करून न शकल्याने बाद ठरविण्यात आले. तसेच व्यापारी व आडते गटातून अनिल बूब यांनी सुनीलकुमार मुंदडा हे नाशिक बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात राहत नसल्याचा आक्षेप घेतला. त्यावर सुनावणी होऊन काल शुक्रवारी निर्णय देण्यात आला. त्यात अनिल बूब यांची हरकत मान्य करीत सुनीलकुमार मुंदडा यांचे तीन अर्ज अवैध ठरविण्यात आले. हमाल-मापारी गटातून चार उमेदवारांनी पाच अर्ज सादर केले होते. त्यातील नितीन जाधव व मयूर शंकपाळ यांचे अर्ज कागदपत्रांची अपूर्तता असल्याचे कारण देत अवैध ठरविण्यात आले. मात्र राजेंद्र पवार यांचा अर्ज वैध ठरविण्यात आल्याने आता हमाल-मापारी गटातून चंद्रकांत निकम व राजेंद्र पवार हे दोघेही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Nine applications for seven candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.