सटाण्यात नऊ इमारती धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:10 AM2021-06-19T04:10:24+5:302021-06-19T04:10:24+5:30
जुन्या सटाणा शहरात अकरा धोकादायक इमारती आजच्या घडीला मृत्यूचा सापळा म्हणून उभ्या आहेत. त्यामध्ये चावडी चौक, सोनार गल्ली, नेहरू ...
जुन्या सटाणा शहरात अकरा धोकादायक इमारती आजच्या घडीला मृत्यूचा सापळा म्हणून उभ्या आहेत. त्यामध्ये चावडी चौक, सोनार गल्ली, नेहरू रोड, मल्हार रोड, जुनी पोस्ट गल्ली, उपासणी गल्ली या भागात धोकादायक घरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. बहुतांश नागरिक आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे जीव धोक्यात घालून पडक्या इमारतीत वास्तव्यास आहेत. पालिका प्रशासन याबाबत उदासीन असल्याचे दिसून येत आहे. पालिका प्रशासनाने गांभीर्याने न घेतल्यास अप्रिय घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आजच्या घडीला पालिका प्रशासनाने फक्त नऊ इमारत मालकांना नोटिसा बजावल्याचे अभियंता कोर यांनी सांगितले . बहुतांश इमारती अद्याप रिकाम्या न केल्याने भर पावसाळ्यात जीवित हानीचा धोका कायम असल्याचे दिसून येत आहे.
---------------------
नगरपरिषदेमार्फत आपत्कालीन परिस्थितीसाठी कार्यवाही करण्यात येत आहे . सन २०२०-२१ या अर्थसंकल्पात आपत्कालीन व्यवस्थेसाठी १५ लाख रुपये तातडीची तरतूद करण्यात आलेली आहे.
===Photopath===
180621\18nsk_7_18062021_13.jpg
===Caption===
१८ सटाणा घरे