खळगाठ जमिनीतुन घेतले नऊ लाखाचे उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2020 05:51 PM2020-09-27T17:51:17+5:302020-09-27T17:52:20+5:30
जळगाव नेऊर : जिल्ह्यात अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या कधी रिमझिम पाऊस तर कधी मुसळधार पावसाने डाळिंब बागावर मोठ्या प्रमाणात तेल्या, ठिपका, प्लेग रोगाने आक्र मण केल्याने अनेक शेतकर्यांनी डाळिंब बागेवर कुर्हाड चालवली पण जळगाव नेऊर शांताराम तुकाराम शिंदे या तरु ण शेतकर्याने जिद्द आण िमेहनतीच्या जोरावर खळगाठ जमिनीवर डाळिंब बाग फुलवुन त्यातून तब्बल नऊ लाखाचे उत्पन्न मिळविले आहे.
जळगाव नेऊर : जिल्ह्यात अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या कधी रिमझिम पाऊस तर कधी मुसळधार पावसाने डाळिंब बागावर मोठ्या प्रमाणात तेल्या, ठिपका, प्लेग रोगाने आक्र मण केल्याने अनेक शेतकर्यांनी डाळिंब बागेवर कुर्हाड चालवली पण जळगाव नेऊर शांताराम तुकाराम शिंदे या तरु ण शेतकर्याने जिद्द आण िमेहनतीच्या जोरावर खळगाठ जमिनीवर डाळिंब बाग फुलवुन त्यातून तब्बल नऊ लाखाचे उत्पन्न मिळविले आहे. शिंदे यांची जळगाव नेऊर येथे विडलोपार्जित अडीच एकर शेती असून एक एकर क्षेत्रावर डाळिंब बाग असुन दीड एकरावर मका लागवड केली आहे, पिहल्या वर्षी अडीच लाख उत्पन्न मिळाले असून आता यावर्षी नऊ लाखाचे उत्पन्न घेतले आहे, यावर्षी मात्र डाळिंब उत्पादक शेतकर्यांचा कसोटीचा काळ होता या कसोटीच्या काळात अनेक शेतकर्यांनी आपल्या डाळिंब बागेवर नांगर चालवला पण शिंदे यांनी यावर मात करून कृषी सेवा केंद्र चालकाच्या मार्गदर्शनानुसार व्यविस्थत नियोजन करून एक एकरात 400 झाडापासुन साधारणपणे 750 कॅरेट उत्पादन घेऊन त्यांच्या उत्पादित मालाला प्रति कॉरेटला उच्चतम चार हजार रु पये भाव मिळाला, त्याखालोखाल साडेतीन हजार, अडीच हजार, 2000, भाव मिळवुन असे त्यांनी चाळीस गुंठ्यात नऊ लाख उत्पादन मिळाले असुन सर्व डाळिंब नाशिक येथे विक्र ी केला, त्यातून एक ते सव्वा लाख रु पये खर्च झालेला असून परिसरातील तरु ण शेतकर्यांना एक आदर्श आहे.
माझी विडलोपार्जित अडीच एकर जमीन असून एक एकर जमिनीवर डाळिंबाची लागवड केली असून दीड एकरावर मका पीक घेतले आहे. आमच्या जमिन खळगाठ असल्याने खिरपाचे पीक पाऊस झाल्यास जास्त झाल्यास येत नाही, त्यामुळे आमची सगळी अशा रब्बी पिकावर अवलंबून असते, कृषी सेवा केंद्र चालकाच्या मार्गदर्शनातून जमिनीत असलेल्या आवश्यक घटकांची मात्रा देऊन औषधांचा व्यविस्थत वापर वापर करून डाळिंब बागेतून यावर्षी नऊ लाख उत्पादन मिळाले.