नऊ महिन्यांच्या बालकाचा डेंग्यूने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 12:54 AM2018-10-28T00:54:27+5:302018-10-28T00:54:53+5:30

शहरातील गावठाण परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुने नाशिकमधील कथडा भागात एका  कुटुंबातील नऊ महिन्यांच्या बालकाचा डेंग्यूसदृश आजाराने मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कारभाराविषयी तीव्र संताप व्यक्त होत आहे.

 Nine months dengue death due to dengue | नऊ महिन्यांच्या बालकाचा डेंग्यूने मृत्यू

नऊ महिन्यांच्या बालकाचा डेंग्यूने मृत्यू

googlenewsNext

नाशिक : शहरातील गावठाण परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुने नाशिकमधील कथडा भागात एका  कुटुंबातील नऊ महिन्यांच्या बालकाचा डेंग्यूसदृश आजाराने मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कारभाराविषयी तीव्र संताप व्यक्त होत आहे.  शहर व परिसरात डेंग्यू, चिकुनगुण्या यांसारख्या आजारांचा फैलाव ‘एडिस’ जातीच्या डासांपासून होत असून, दुसरीकडे विषाणूजन्य आजारांनीही डोके वर काढल्याने नागरिक हैराण झाले आहेत; मात्र महापालिकेचा आरोग्य विभाग अद्यापही सुस्त आहे. विषाणूजन्य आजारांसह डेंग्यू, चिकुनगुण्यासारख्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यास आरोग्य विभाग, शहरी आरोग्य विभाग व हिवताप नियंत्रण विभाग पूर्णत: अपयशी ठरले आहे. सध्या  महापालिकेमधील प्रशासकीय कारभारासह लोकप्रतिनिधींचा कारभारही थंडावला आहे. लोकप्रतिनिधींचा अधिकाºयांवर वचक न राहिल्याने प्रशासनाकडून शहरात मूलभूत सोयी-सुविधांची कामे करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. डेंग्यू, चिकुनगुण्या यांसारख्या आजारांनी थैमान घातले असतानाही प्रशासन मात्र झोपेचे सोंग घेऊन निद्रिस्त झाल्याचे दिसून येत आहे.  जुने नाशिकमधील कथडा परिसरात या आजारांनी नागरिक त्रस्त झाले असून, याच भागात राहणारे रिक्षाचालक नवाज शेख यांचा एकुलता एक मुलगा अशरफ अवघ्या नऊ महिन्यांचा असतानाच डेंग्यूच्या डासाने दंश केल्याने त्याची प्रकृती खालावली. रोगप्रतिकारक शक्तीचा विकास न झाल्याने बालकाचा डेंग्यूशी लढा अपयशी ठरला. शुक्रवारी उपचारादरम्यान या चिमुकल्याची प्राणज्योत मालवली. कथडा भागातील सुमारे दहा ते पंधरा कुटुंबांमध्ये डेंग्यूसदृश आजाराची लागण झालेले रुग्ण औषधोपचार घेत आहेत.
या भागात डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती ठिकाणे तत्काळ शोधून डासांच्या अळ्या, अंडी वगैरे नष्ट करण्यावर भर देण्याची गरज आहे. कथडा परिसरापासून महापालिकेचे डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय अगदी जवळ जरी असले तरी या रुग्णालयात दर्जेदार गुणवत्तापूर्ण औषधोपचार रुग्णाला मिळेलच याची शाश्वती नाही. त्यामुळे नागरिक शक्यतो या रुग्णालयात जाणे टाळतात.
नागरिक हैराण
शहर व परिसरात डेंग्यू, चिकुनगुण्या यांसारख्या आजारांचा फैलाव ‘एडिस’ जातीच्या डासांपासून होत असून, दुसरीकडे विषाणूजन्य आजारांनीही डोके वर काढल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
लोकप्रतिनिधींचा अधिकाºयांवर वचक न राहिल्याने प्रशासनाकडून शहरात मूलभूत सोयी-सुविधांची कामे करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

Web Title:  Nine months dengue death due to dengue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.