वडाळ्यात पुन्हा दहा रुग्ण : शहराचा कोरोनाग्रस्तांचा आकडा आता २१४

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 10:17 PM2020-05-31T22:17:28+5:302020-05-31T22:18:33+5:30

शहरात रविवारी दिवसभरात एकूण ३० कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले. इतक्या मोठ्या प्रमाणात एकाच दिवशी रुग्ण आढळून येण्याची ही पहिलीच वेळ आहे. शहरातील गावठाण भागासह झोपडपट्ट्यांच्या परिसरात आता कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत चालला आहे.

Nine more patients in Wadala: The number of corona victims in the city is now 214 | वडाळ्यात पुन्हा दहा रुग्ण : शहराचा कोरोनाग्रस्तांचा आकडा आता २१४

वडाळ्यात पुन्हा दहा रुग्ण : शहराचा कोरोनाग्रस्तांचा आकडा आता २१४

Next
ठळक मुद्दे१३९ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत.शहरात रविवारी एकूण ३० कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले.

नाशिक : शहरात कोरोना बधितांची संख्या वाढतच असून दिवसभरात 30 संशियत रु ग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरातील बधितांची संख्या २१४ वर पोहोचली आहे. शहरातील वडाळागाव, शिवाजीवाडी, जुने नाशिक आणि पेठ रोड सारख्या दाट लोकवस्ती पाठोपाठ आता गंजमाळ येथे देखील कोरोना ने शिरकाव केला आहे. वडाळागावात रविवारी (दि.३१) संध्याकाळी साडेसात वाजेच्या अहवालानुसार एकूण दहा नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. येथील महेबुबनगर भागात सात रूग्ण तर एक ६०वर्षीय इसम झीनतनगरमध्ये पॉझिटिव्ह आढळून आल्याने खळबळ उडाली. तसेच एक ९ वर्षीय बालिका व ५० वर्षीय पुरूष हे वडाळागावात गावठाण भागात पॉझिटिव्ह आढळून आले. तसेच विनयनगरमध्ये एक १३ वर्षीय मुलगी आणि ३२ वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले तर पाथर्डीफाटा येथे एका ४८ वर्षाचा पुरूष तर येथील धोंडे मळा भागात ३८ वर्षाच्या महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले. त्याचप्रमाणे पेठफाटा येथील स्नेहनगरमधील ६५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा उपचारादरम्यान दोन दिवसांपुर्वी मृत्यू झाला असून त्यांचाही अहवाल कोरोना पॉझिटिव्ह प्राप्त झाला. त्याचप्रमाणे नाशिकरोड येथील गोसावीवाडी मध्येही ५४ वर्षीय महिला तर अशोकामार्ग येथील एक ३९ वर्षाचा पुरूष कोरोनाबाधित आढळून आला. दिंडोरीरोडवरील कलानगरमध्येही एका ५७ वर्षाच्या महिलेला तर लेखानगरमध्ये ३० वर्षाच्या तरूणाला कोरोनाची बाधा झाली. दिवसभरात लेखानगर भागात एकूण ४ कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले.नाशिक महापालिकेच्या हद्दीत आता कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा ९ झाला आहे. जुन्या नाशकात एक ७६ वर्षीय वृध्द महिला पॉझिटिव्ह आढळून आली. ओम गुरूदेवनगर येथील रुग्णाच्या संपर्कात आलेल्या मखमलाबादरोडवर२१ व २३ वर्षाचे युवक आणि ४६ वर्षाची महिलेला कोरोना झाल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले. तसेच शिंगाडा तलाव येथील ड्रीम व्हॅलीमध्ये एका ४६ वर्षीय रहिवाशाला कोरोनाची बाधा झाली. पंचशीलनगरमध्ये एका ३५ वर्षीय महिलेलाही कोरोना झाल्याचे समोर आले आहे. खोडेनगर येथील एका ३८ वर्षीय पुरूषाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तसेच काळे चौक, वडाळानाका येथे राहणाऱ्या ५६ वर्षीय महिलेलाही कोरोनाची बाधा झाली.
महापालिका हद्दीतील ६६ रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत तर १३९ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. नाशिक शहरात रविवारी दिवसभरात एकूण ३० कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले. इतक्या मोठ्या प्रमाणात एकाच दिवशी रुग्ण आढळून येण्याची ही पहिलीच वेळ आहे. शहरातील गावठाण भागासह झोपडपट्ट्यांच्या परिसरात आता कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत चालला आहे.
शहरातील बधितांची संख्या वाढत असून त्यांच्या संपर्कात असलेल्या संशियत रु ग्णांना कोरंटाईन करावे लागत असल्याने मनपाला आता अधिक जागेची गरज लागणार आहे. त्यामुळे समाज कल्याण विभागाचे वसतिगृह ताब्यात घेऊन 450 संशियत रु ग्ण तेथे ठेवण्यात येणार आहे . समाज कल्याण खात्याने त्यास मान्यतादेखील दिली आहे.

Web Title: Nine more patients in Wadala: The number of corona victims in the city is now 214

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.