नऊ गावे, दहा वाड्यांसाठी सहा टॅँकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 11:47 PM2019-04-02T23:47:23+5:302019-04-02T23:48:54+5:30
चांदवड : तालुका परिसरात गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळी स्थिती आहे. सध्या तालुक्यातील नऊ गावे व दहा वाड्यांना सहा टॅँकरने पाणीपुरवठा सुरू असल्याची माहिती प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे, तहसीलदार प्रदीप पाटील, पाणीपुरवठा विभागाचे सी.पी. मोरे, सोमनाथ भोसले यांनी दिली.

हिरापूर, बोपाणे, कळमदरे, परसूल, उसवाड, नांदूरटेक, देवरगाव, भोयेगाव, जोपूळ या नऊ गावांना, तर हिरापूरची धनगरवाडी, तळेगाव रोहीची दत्तवाडी, बजरंगनगर, घुमरे वस्ती, काजीसांगवीचे दुर्गानगर, नांदूरटेकची चिंचबारी, शिंगवेची झाल्टे व मढे वस्ती, रामवाडी, खताळ वस्ती, शिंदे व खताळ वस्ती, भाटगावची माळीवस्ती या दहा वाड्यांवर पाणीटंचाई असल्याने टॅँकर सुरू आहेत. काही गावांना दोन, तर काही गावांना टँकरची एक खेप सुरू आहे. तालुक्यातील काही गावांना दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे, असे पाणीपुरवठा विभागामार्फत सांगण्यात आले.
गेल्या दोन वर्षांपूर्र्वी जून ते जुलै महिन्यापर्यंत टॅँकरने पाणीपुरवठा करावा लागला होता. तर यंदाच्या वर्षी पाणीटंचाई भीषण असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. टॅँकरची संख्या वाढणारगेल्या वर्षी बऱ्याच गावांमध्ये जलयुक्तची कामे झाल्याने परिसरातील बंधारे व विहिरींमध्ये पाणी टाकण्यात आले होते. मात्र यंदा मार्चपासून उन्हाचा तडाखा वाढल्याने पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. एप्रिल- मेमध्ये पाणीटंचाईचे भीषण चित्र असेल, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. पाणीटंचाईची तीव्रता जसजशी वाढेल तशी टॅँकरची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.