नव्वद दिवसांनंतर कुणाची भरणार शंभरी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 01:05 AM2018-05-08T01:05:48+5:302018-05-08T01:05:48+5:30

आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली त्यावेळी महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांना ९० दिवसांत कामकाजात सुधारणा करण्याचा अल्टीमेटम आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला होता. महापालिकेत आयुक्तांच्या कारकीर्दीला येत्या बुधवारी (दि. ९) नव्वद दिवस पूर्ण होत असून, त्यानंतर कुणाची शंभरी भरणार, याबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार असून, सर्वांनीच धसका घेतला आहे.

 Ninety days after the day will be filled? | नव्वद दिवसांनंतर कुणाची भरणार शंभरी?

नव्वद दिवसांनंतर कुणाची भरणार शंभरी?

Next

नाशिक : आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली त्यावेळी महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांना ९० दिवसांत कामकाजात सुधारणा करण्याचा अल्टीमेटम आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला होता. महापालिकेत आयुक्तांच्या कारकीर्दीला येत्या बुधवारी (दि. ९) नव्वद दिवस पूर्ण होत असून, त्यानंतर कुणाची शंभरी भरणार, याबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार असून, सर्वांनीच धसका घेतला आहे.  तुकाराम मुंढे यांनी महापालिका आयुक्तपदाची सूत्रे दि. ९ फेब्रुवारी २०१८ रोजी हाती घेतली होती. त्यावेळी आयुक्तांनी पहिले तीन महिने सर्व अधिकारी व कर्मचारी यांना कामकाजात शिस्त लावण्याबरोबरच सुधारणा करण्याचा अल्टीमेटम दिला होता. नव्वद दिवसांत कामकाजात सुधारणा न झाल्यास कर्तव्यात कसूर करणाºया अधिकारी व कर्मचारी यांना घरी पाठविण्याचाही इशारा देण्यात आला होता. सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्या तीन-चार दिवसांत त्यांनी स्वच्छता मोहीम राबविली होती. शिवाय, दफ्तर व्यवस्थित ठेवण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, गेल्या १ मे रोजी महाराष्टÑ व कामगार दिनानिमित्त राजीव गांधी भवनच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात आयुक्तांनी सर्व विभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांना बोलावून घेत त्यांना ९० दिवसांच्या अल्टीमेटमचे स्मरण करून दिले होते. यावेळी आयुक्तांनी झाडाझडती घेत ९० दिवसांत ज्यांच्या कामकाजात सुधारणा झालेली नसेल त्यांना घरी पाठविण्याचा इशारा दिला होता. आता आयुक्तांच्या कारकीर्दीला येत्या ९ मे रोजी ९० दिवस पूर्ण होत असून, त्यानंतर कुणावर कारवाईची कुºहाड कोसळते याविषयी महापालिका वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. आयुक्तांकडून धडक कारवाई केली जात असल्याने साºयाच अधिकारी व कर्मचाºयांनी धसका घेतला आहे. त्यामुळे गेल्या दोन-तीन दिवसांपासून अधिकारी व कर्मचारी यांनी आपल्याकडील दफ्तर अद्ययावत करण्याबरोबरच प्रलंबित फायलींचा निपटारा करण्यावर भर दिलेला आहे.
कर्मचायांचे प्रशिक्षण
महापालिकेत आस्थापना विषय हाताळणाºया १०० कर्मचाºयांचे प्रशिक्षण घेतले जाणार आहे. दि. ११ ते १३ मे या कालावधीत ५० कर्मचारी, तर दि. २५ ते २७ मे या कालावधीत ५० कर्मचारी यांचे निवासी प्रशिक्षण शिबिर नाशिकरोड येथील विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेत आयोजित करण्यात आले आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ६.३० या वेळेत होणारे हे प्रशिक्षण अनिवार्य करण्यात आले आहे. प्रशिक्षणास अनुपस्थित राहणाºया कर्मचाºयांच्या वेतनातून प्रशिक्षणाचा खर्च वसूल केला जाणार आहे.

Web Title:  Ninety days after the day will be filled?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.