रशियाची सिस्टर सिटी होण्यास मनपा राजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 01:19 AM2018-12-08T01:19:17+5:302018-12-08T01:20:11+5:30

रशियातील उडान उले या शहराची सिस्टर सिटी होण्यास महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी फुली मारली असली तरी आता मात्र प्रशासनाने हा प्रस्ताव पुनरुज्जीवित केला असून, येत्या पंधरा दिवसांत महापालिकेची सकारात्मक भूमिका प्रशासन शासनाला कळविणार आहे.

Nipa agreed to become Russia's Sister City | रशियाची सिस्टर सिटी होण्यास मनपा राजी

रशियाची सिस्टर सिटी होण्यास मनपा राजी

Next
ठळक मुद्देमुंढे यांच्या निर्णयात बदल पंधरा दिवसांत अहवाल शासनाला पाठविणार

नाशिक : रशियातील उडान उले या शहराची सिस्टर सिटी होण्यास महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी फुली मारली असली तरी आता मात्र प्रशासनाने हा प्रस्ताव पुनरुज्जीवित केला असून, येत्या पंधरा दिवसांत महापालिकेची सकारात्मक भूमिका प्रशासन शासनाला कळविणार आहे.
सुमारे दीड महिन्यांपूर्वी यासंदर्भात केंद्रशासनाने राज्य शासनानाला आणि राज्य शासनाने राज्यातील सर्व महापालिकांना पत्र धाडले होते व रशियाची सिस्टर सिटी होण्याबाबत विचारणा केली. याप्रकल्पाअंर्तगत दोन्ही शहरातील देवाण-घेवाण वाढविण्यात येणार असून, त्या त्या शहरातील पायाभूत सुविधांचे अनुकरण तसेच पीपीपी मॉडेल अंतर्गत पायाभूत कामे करणे, दोन्ही शहरातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रशासकीय आणि राजकीय नेतृत्वगुण वाढीस लावणे याबाबत प्रयत्न केले जाणार आहेत. यासंदर्भातील प्रस्ताव सादर केल्यानंतर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ज्या शहराच्या नावाचे उच्चारणेही इतके कठीण ते बघता अकारण करार करणे फारसे व्यावहारिक नसल्याचे सांगून या प्रस्तावावर फुली मारली होती. तथापि, तुकाराम मुंढे यांच्या बदलीनंतर आता प्रशासनाने हा विषय पुनरुज्जीवित करण्याच्या हालचाली केल्या असून, येत्या पंधरा दिवसांत सकारात्मक उत्तर प्रशासनाला पाठविले जाणार आहे.
प्रस्ताव बारगळला होता
महापालिकेस यापूर्वी चीन सरकारनेदेखील सिस्टर सिटीचा प्रस्ताव दिला होता. मात्र पुढे भारत आणि चीन यांच्या संबंधात डोकलाम प्रकरणावरून दुरावा निर्माण झाल्याने हा प्रस्ताव बारगळला होता. मात्र रशियाबाबत महापालिकेची भूमिका अनुकूल झाली आहे.

Web Title: Nipa agreed to become Russia's Sister City

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.