‘निपाह’मुळे नाशकात महापालिकेकडून विशेष कक्ष कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 02:54 PM2018-05-23T14:54:34+5:302018-05-23T14:54:34+5:30

सतर्कता : लक्षणे दिसून आल्यास वैद्यकीय तपासणीचे आवाहन

 Nipah executes special cell from Nashik Municipal Corporation Nashik | ‘निपाह’मुळे नाशकात महापालिकेकडून विशेष कक्ष कार्यान्वित

‘निपाह’मुळे नाशकात महापालिकेकडून विशेष कक्ष कार्यान्वित

Next
ठळक मुद्देनाशिक शहरात मोठ्या संख्येने केरळी बांधव वास्तव्यास आहेत नाशिकमधून केरळमध्ये पर्यटनासाठी जाणा-यांची संख्या मोठी

नाशिक - केरळमध्ये ‘निपाह’ विषाणूंमुळे १३ जणांचे बळी गेल्यानंतर नाशिक महापालिकाही सतर्क झाली असून जुन्या नाशकातील डॉ. झाकीर हुसेन तथा कथडा रुग्णालयात विशेष कक्ष कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ. राजेंद्र भंडारी यांनी दिली आहे.
नाशिक शहरात मोठ्या संख्येने केरळी बांधव वास्तव्यास आहेत. प्रामुख्याने, आर्टीलरी सेंटर, नोटप्रेस, गांधीनगर प्रेस या केंद्र सरकार अखत्यारित येणाऱ्या कार्यालयांमध्येही केरळी बांधव सेवेत आहेत. सध्या सुटीचा हंगाम असल्याने अनेक केरळी बांधव आपल्या प्रांतात गावी गेले आहेत. सुटीचा कालावधी संपत आल्याने परतीचा प्रवासही सुरू झालेला आहे. याशिवाय, नाशिकमधून केरळमध्ये पर्यटनासाठी जाणा-यांची संख्या मोठी असते. केरळमध्ये प्रवास करण्याचे टाळावे आणि सतर्कता बाळगण्याचे आवाहन महाराष्ट्र सरकारने केले असतानाच नाशिक महापालिकेनेही सतर्कता म्हणून जुन्या नाशकातील कथडा रुग्णालयात विशेष कक्ष कार्यान्वित केला आहे. निपाह व्हायरसमुळे ३ ते १४ दिवसांचा ताप, डोकेदुखी, श्वास घेण्यास अडचणी, मेंदूला सूज तसेच मांसपेशी दुखणे आदी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे सदर लक्षणे आढळून आल्यास त्यांनी कथडा रुग्णालयात विशेष कक्षात तपासणी करून घ्यावी, असे आवाहन डॉ. राजेंद्र भंडारी यांनी केले आहे.
घाबरण्याचे कारण नाही
महाराष्ट सरकारकडून अद्याप कोणतेही निर्देश प्राप्त झालेले नाहीत परंतु, नाशिक महापालिकेने सतर्कता म्हणून डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात विशेष कक्ष कार्यान्वित केलेला आहे. सदर व्हायरसचा महाराष्टला धोका नाही. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. तरीही लक्षणे आढळून आल्यास तत्काळ वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी.
- डॉ. राजेंद्र भंडारी, वैद्यकीय अधिक्षक, मनपा

Web Title:  Nipah executes special cell from Nashik Municipal Corporation Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.