निफाड परिसराला पावसाने झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 12:17 AM2017-10-11T00:17:02+5:302017-10-11T00:19:03+5:30

शहर परिसरात मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसाने अक्षरश: झोपडून काढले. सर्वत्र पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते.

The Niphad area was overwhelmed by rain | निफाड परिसराला पावसाने झोडपले

निफाड परिसराला पावसाने झोडपले

Next

निफाड : शहर परिसरात मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसाने अक्षरश: झोपडून काढले. सर्वत्र पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. जिल्ह्यातील अनेक भागात पावसाचा जोर कायम असून, पूर्व भागातील धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तालुक्यातील नांदूरमधमेश्वर धरणातून १४,२३४ क्यूसेकने विसर्ग सुरू असल्याने तालुक्यातील नद्या-नाल्यांना पूरस्थिती आली आहे. परतीच्या पावसाने शेतकºयांचे नुकसान केले आहे. या पावसामुळे द्राक्षबागांवर डावण्या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने बागायतदार शेतकरी चिंतित झाले आहे.
मागील आठवड्यात सूर्यनारायणाने निफाडकरांना भाजून काढले होते. प्रचंड उकाड्याने निफाडकर हैराण झाले होते. रविवारी व सोमवारी संततधार पावसाने निफाड व परिसरात हजेरी लावल्याने दिलासा दिला होता; मात्र मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसाने शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.
मंगळवारी दुपारी १२ वाजेनंतर सुरू झालेला पाऊस दिवसभर सुरू होता. पावसाचा जोर कमी जास्त होत होता. पावसामुळे शहर परिसरातील अनेक सखल भागात पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले होते. पावसाचा दिवसभर जोर असल्याने अनेक शेतात पाणी साचले आहे. ढगाळ वातावरण व सततचा पावसामुळे द्राक्ष व सोयाबीन उत्पादकांत चिंतेचे वातावरण पसरले आहे. सध्या द्राक्षबागा फुलोºयाच्या टप्प्यात असून, ढगाळ वातावरण व पाऊस यामुळे द्राक्षमण्याची गळ होत आहे. यामुळे द्राक्षाच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे. हा पाऊस द्राक्षांना उपयोगी नसल्याने द्राक्षांवर डावणी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. फुलोºयातील गळ वाढल्याने शेतकरी महागडी औषधे फवारणी करून बागा वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे. या पावसामुळे सोंगणीसाठी आलेल्या सोयाबीनची पाने गळून पडण्यास प्रारंभ झाल्याने सोयाबीन खराब होण्याचा धोका वाढला आहे. सोयाबीनचे दाणे काळसर पडतात की काय अशी चिंंता व्यक्त केली जात आहे. यामुळे सोयाबीन उत्पादक चिंतित झाला आहे. दोन दिवसांपासून तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील पूर्व भागातील गंगापूर, दारणा, कडवा, वालदेवी, पालखेड या धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने गोदावरी आणि कादवा, बाणगंगेला पूर आला आहे. तसेच हे पाणी नांदूरमधमेश्वर बंधाºयात येत असल्याने नांदूरमधमेश्वरमधून विसर्ग सुरू आहे. एकूण एकूण ५ दरवाजांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सकाळी ६ वाजता ५ दरवाजे उघडण्यात आले. यातून २५५४८ क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आहे.





 

Web Title: The Niphad area was overwhelmed by rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.