निफाड : तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथील केजीएस साखर कारखान्याचा बॉयलर प्रदीपन समारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 11:04 PM2017-11-19T23:04:58+5:302017-11-19T23:08:19+5:30
केजीएस कारखान्याचे बॉयलर प्रदीपन निफाड : तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथील केजीएस साखर कारखान्याचा बॉयलर प्रदीपन समारंभ रविवारी (दि. १९) कारखान्याच्या कार्यस्थळावर पार पडला.
निफाड : तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथील केजीएस साखर कारखान्याचा बॉयलर प्रदीपन समारंभ रविवारी (दि. १९) कारखान्याच्या कार्यस्थळावर पार पडला.
सकाळी ११ वाजता कैलास दत्तू डेर्ले, रमेश झुंबर शिंदे, ज्ञानेश्वर खाडे यांनी सपत्नीक बॉयलर अग्निपूजन केले. याप्रसंगी बोलताना कारखान्याचे अध्यक्ष प्रल्हाद पाटील कराड म्हणाले, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा हा कारखाना यावर्षी जास्तीत जास्त उसाचे गाळप करणार आहे . कारखान्याच्या संचालक मंडळाने जास्तीत जास्त ऊस उत्पादक शेतकºयांशी संपर्क साधलेला आहे. जास्तीत जास्त ऊस उत्पादक शेतकºयांनी या कारखान्याला उसाचा पुरवठा करावा, असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी या कारखान्याचे अध्यक्ष प्रल्हाद पाटील कराड, उपाध्यक्ष संतोष बोडके, कारखान्याचे संचालक गणेश कराड, मंजूषा बोडके, देवाशिष मंडल, रतन पाटील वडघुले, सदाशिव सांगळे, भिकाभाऊ सानप, देवीदास खाडे, वसंत नाईक, संजय सांगळे, शरद कुटे, दशरथ गिते, बाळासाहेब कराड, मोहन बोडके, किसन गवते, विठ्ठल घुगे, विश्वास कराड, विश्वनाथ दराडे यांच्यासह असंख्य ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.शेतकºयांची बैंठक
दोन दिवसांपूर्वी या कारखान्याच्या कार्यस्थळावर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकºयांची बैठक झाली होती. या बैठकीत ऊस उत्पादक शेतकºयांची गरज लक्षात घेऊन हा कारखाना लवकरात लवकर चालू करावा अशी एकमुखाने मागणी केली होती. या मागणीचा विचार करून तातडीने संचालक मंडळाने कारखाना चालू करण्याबाबत कार्यवाही केली व रविवारी कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन पार पडले.