निफाडला ८० हजारांचा ऐवज लांबविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 11:53 PM2018-02-18T23:53:24+5:302018-02-18T23:56:16+5:30
निफाड : येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोल मेळाव्यात अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत ऐवज व रोख रकमेसह ७९,२०० रुपयांवर डल्ला मारला. दुसरीकडे या मेळाव्यात हात साफ करण्याचा प्रयत्न करणाºया एका संशयितास मेळाव्यातील कार्यकर्त्यांनी पकडून निफाड पोलिसांच्या ताब्यात दिले.

याबाबत निफाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निफाड येथील शिवाजी चौकात राष्ट्रवादीचा मेळावा चालू असतानाच अज्ञात चोरट्यांनी मेळाव्यास आलेल्या कार्यकर्त्यांच्या मोबाइल, सोन्याची चेन यासह रोख रकमेवर डल्ला मारला. यात निफाड तालुक्यातील जळगाव येथील बाळकृष्ण शिवराम कराड यांच्या गळ्यातील पन्नास हजार रु पये किमतीची दोन तोळ्यांची चेन, दोन व्यक्तीच्या खिशातील चोवीस हजार दोनशे रुपये रोख व एका व्यक्तीचा पाच हजार रुपये किमतीचा मोबाइल असा ७९ हजार २०० रु पयांची रोख रक्कम व मुद्देमालावर हात साफ केला.
दरम्यान, सदरचा मेळवा सुरू असतानाच अशा प्रकारे हात साफ करण्याचा प्रयत्न करणारा रवि सोपान शिंदे (मु. पो. जि. बीड) या संशयितास मेळाव्यातील कार्यकत्यांनी रंगेहाथ पकडले व निफाड पोलिसांच्या ताब्यात दिले. संशयित शिंदे यास निफाड न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्याला दि. २१ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या प्रकरण पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक नरेंद्र पाटील अधिक तपास करीत आहेत.