निफाडला महिलांविषयी कायदे जागृती कार्यक्र म यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 04:25 PM2018-10-29T16:25:08+5:302018-10-29T16:27:06+5:30
निफाड : महाराष्ट्र राज्य महिला आयोग, मुंबई व स्वामी विवेकांनंद सामाजिक, सार्वजनिक सेवा संस्था, निफाड यांच्या संयुक्त विद्यमाने निफाड येथे महिला विषयी कायदे जागृती कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते, त्यास चांगला प्रतिदास मिळाला. कार्यक्र माचे उदघाटन आमदार अनिल कदम व जिल्हा परिषद सदस्य कलावती चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्तविक स्वामी विवेकानंद सामाजिक सार्वजनिक सेवा संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष शंकर वाघ यांनी केले. निफाडच्या नगरसेवक मोनाली वाघ यांनी स्वागत केले. आमदार कदम यांचे भाषण झाले.
निफाड : महाराष्ट्र राज्य महिला आयोग, मुंबई व स्वामी विवेकांनंद सामाजिक, सार्वजनिक सेवा संस्था, निफाड यांच्या संयुक्त विद्यमाने निफाड येथे महिला विषयी कायदे जागृती कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते, त्यास चांगला प्रतिदास मिळाला.
कार्यक्र माचे उदघाटन आमदार अनिल कदम व जिल्हा परिषद सदस्य कलावती चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्तविक स्वामी विवेकानंद सामाजिक सार्वजनिक सेवा संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष शंकर वाघ यांनी केले. निफाडच्या नगरसेवक मोनाली वाघ यांनी स्वागत केले. आमदार कदम यांचे भाषण झाले.
याप्रसंगी निफाड तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना विभागाच्या नायब तहसीलदार पुनम दंडीले यांनी मतदार नोंदणी व निराधार महिलांविषयीच्या योजनांविषयी माहिती दिली. महिला आघाडीच्या अध्यक्षा रोहिनी नायडू यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोग व तक्र ार निवारण समिती व तिचे कार्य याविषयी माहिती दिली. वैशाली आडके, जयश्री वानखेडे, सुवर्णा जगताप यांनी महिलांच्या समस्या विषयी कायद्याप्रती तपशीलवार माहिती सांगितली.
जेष्ठ विधिज्ञ माधव वाघ यांनीही महिलांच्या कायद्याविषयी माहिती दिली. निफाड उपजिल्हा रु ग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. आर. राठोर यांनी स्त्रियांच्या आरोग्याविषयी व त्या अनुषंगाने असणाऱ्या कायद्याविषयी माहिती दिली. जेष्ठ विधिज्ञ सरोज चंद्रात्रे यांनी आपल्या ग्रामीण शैलीत सायबर क्र ाइम, महिलांचा कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ, कौटुंबिक हिंसाचार आदींविषयी माहिती सांगितली. जेष्ठ विधीज्ञ वाल्मिकराव गायकवाड यांनी मुलीला संपत्तीत असणारा अधिकार, हुंडाबळी, हिंदू वारस हक्क याविषयी माहिती दिली. निफाड नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी संगीता नांदूरकर यांनी शासकीय व अशासकीय ठिकाणी नोकरी करणाºया महिलांना येणाºया अडचणी व समस्येला तोंड देऊन कस काम करावं याविषयी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी मंजुषा पाटील, स्मिता कुलकर्णी, वैशाली बनकर, डॉ. सीमा डेर्ले, ऐश्वर्या जगताप, ऐश्वर्या वाघ, सरला कुयटे, प्रियंका वाघ, सविता वाघ, उषा आहेर, विजय शिंदे, सुनील माळी, झुंबरबाई कराटे, सुमन बर्डे, निर्मला पवार, पंढरीनाथ पीठे, परेश शहा, नगरसेवक जावेद शेख, आनंद बिवलकर, मोनली वाघ, दत्तू सुडके, इरफान सय्यद, संजय कुंदे, अॅड. रमेश ठाकरे आदीसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्र माचे सूत्र संचालन अॅड. शरद वाघ व अॅड. लक्ष्मण वाघ यांनी केले. आभार प्रदर्शन सीमा शिंदे यांनी केले.