निफाडला स्वातंत्र्यदिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 00:55 IST2020-08-18T22:27:59+5:302020-08-19T00:55:25+5:30
निफाड : परिसरात विविध संस्था तसेच शासकीय कार्यालयांत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. तहसील कार्यालयात निफाडच्या प्रांत अर्चना पठारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

निफाड तहसील कार्यालयात राष्टÑध्वजास मानवंदना देताना प्रांत अर्चना पठारे. समवेत तहसीलदार दीपक पाटील आदी.
लोकमत न्यूज नेटवर्क
निफाड : परिसरात विविध संस्था तसेच शासकीय कार्यालयांत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. तहसील कार्यालयात निफाडच्या प्रांत अर्चना पठारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
याप्रसंगी तहसीलदार दीपक पाटील आदींसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. मातोश्री जसोदाबाई सोनी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ शेलार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
याप्रसंगी संस्थेचे विश्वस्त शशांक सोनी, अशोक कापसे, चंद्रभान गिते, कमलाकर कहाणे, मुख्याध्यापक ज्ञानदेव ढोमसे, मुख्याध्यापक नितीन कडलग व कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथे पोलीस उपअधीक्षक माधव रेड्डी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
निफाड पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक रंगराव सानप यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कुंदेवाडी वीज वितरण कंपनी कार्यालय येथे वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता बकंट सुरवसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
वैनतेय विद्यालयात न्या. रानडे विद्याप्रसारक मंडळाचे विश्वस्त वि.दा. व्यवहारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी रतन पाटील वडघुले, राजेंद्र राठी, दिलीप वाघवकर, मधुकर राऊत, विश्वास कराड, प्राचार्य डी. बी. वाघ, पर्यवेक्षक संतोष गोरवे, प्राचार्य देवेंद्र सांबरे, सुजाता तनपुरे, प्रसन्ना कुलकर्णी, प्रा. राजेंद्र सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.