निफाड, लासलगावला पाऊस
By admin | Published: September 9, 2015 12:02 AM2015-09-09T00:02:58+5:302015-09-09T00:03:26+5:30
निफाड, लासलगावला पाऊस
लासलगाव / निफाड : दीर्घ कालावधीनंतर मंगळवारी सायंकाळच्या सुमारास जिल्ह्यातील निफाड आणि लासलगाव येथे मुसळधार पाऊस झाला. लासलगाव येथे सायंकाळी ५ वाजता पावसाने जोरदार हजेरी लावली.
या पावसामुळे वातावरणातील उष्मा जाऊन थंडावा निर्माण झाला. मुसळधार पाऊस मोठ्या विश्रांतीनंतर आला. त्यामुळे बालगोपाळ पावसात मनसोक्त भिजत आनंद लुटतांना दिसून आले. जागोजागी पाणी साचलेले दिसून आले. निफाड व परिसरातील गावांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळण्याची आशा पल्लवित झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
निफाडकर पंधरवड्यापासून प्रचंड उकाड्याने हैराण झाले होते. मंगळवारी सकाळपासूनच वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत होता. संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास परिसरात पावसाने जवळपास अर्धा तास दमदार हजेरी लावली. पुन्हा काहीवेळ उघडीप घेतल्यानंतर संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास निफाड, जळगाव, सुंदरपूर, कोठुरे, पिंपळस, उगाव, खेडे, वनसगाव या परिसारत पावसाने पुन्हा जोरदार आगमन केले. येथे रात्री उशिरापर्यंत
पावसाच्या सरीवरसरी कोसळत होत्या. त्यामुळे सोयाबीनसह खरीप हंगामातील इतर पिक ांनाही जीवदान मिळाले असून, उगाव, खेडे व उत्तर भागातील गावांमध्ये पाणीटंचाईची झळ बसलेल्या द्राक्षबागांनाही या पावसामुळे आधार मिळाल्याने परिसरातील शेतकरी सुखावला
आहे.(प्रतिनिधी)