निफाडला व्यापारी गाळ्यांना आग लागून सव्वा कोटीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:18 AM2021-09-08T04:18:49+5:302021-09-08T04:18:49+5:30

निफाड : शहरातील उगाव रोडवरील नऊ व्यापारी गाळ्यांना मंगळवारी रात्री आग लागून एकूण १,२९,४१,५१० ...

Niphad lost Rs | निफाडला व्यापारी गाळ्यांना आग लागून सव्वा कोटीचे नुकसान

निफाडला व्यापारी गाळ्यांना आग लागून सव्वा कोटीचे नुकसान

googlenewsNext

निफाड : शहरातील उगाव रोडवरील नऊ व्यापारी गाळ्यांना मंगळवारी रात्री आग लागून एकूण १,२९,४१,५१० रुपयांचे नुकसान झाले. आगीचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. उगावरोड येथे पत्र्याचे बांधकाम केलेले व्यापारी गाळे आहेत. मंगळवारी रात्री पाऊण वाजण्याच्या सुमारास या गाळ्यांना आग लागली. ही घटना जवळच असलेल्या नागरिकांनी पाहिल्यानंतर तातडीने या गाळे मालकांना घटनेची माहिती कळवण्यात आली. यानंतर उपस्थित नागरिक, तरुणवर्ग यांनी ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. शिवाय निफाड नगरपंचायतीचा पाण्याचा टँकर, पिंपळगांव बसवंत आणि नाशिक येथील अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांनी ही आग विझवण्याचा प्रयत्न केला. उपस्थित नागरिक आणि तरुण वर्गाने प्रयत्नांची शिकस्त करून आग विझवण्याचा प्रयत्न केला. नागरिक आणि तरुण वर्ग यांनी पुढे सरकणारी आग आटोक्यात आणली नसती तर अजून बरेच गाळे आगीत खाक झाले असते व मोठा अनर्थ घडला असता. आगीत नवीनच व्यवसाय सुरु झालेल्या व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, नऊ दुकाने जळून खाक झाली आहे आहेत. सीताराम गायकवाड यांचे सनिज मेन्स पार्लर, सोहेब शैख यांचे मेहक किड्स अँड मेन्स वेअर (कापड दुकान), राजेंद्र खैरे यांचे ईश्वरी ऑटो सेंटर, रुपाली निफाडे यांचे समृद्धी ट्रेडर्स, विजय निफाडे यांचे वसुंधरा हार्डवेअर, आरिफ अन्सारी यांचे महाराष्ट्र ट्रेडर्स, विकास कसबे यांचे श्री साई दूध संकलन केंद्र, सचिन ढेपले यांची मल्हार खानावळ, संतोष सोळसे यांचे सोळसे इलेक्ट्रिकल अँड सर्व्हिसेस या नऊ जणांचे मिळून एकूण साधारण १ कोटी २९ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

-----------------------

दुकानदारांना अश्रू अनावर

नुकसान झालेले सर्व तरुण व्यावसायिक असून, त्यांनी कर्ज काढून व्यवसाय सुरु केले होते. हे नुकसान पाहून यातील दुकानदारांना अश्रू आवरत नव्हते. घटनास्थळी निफाडचे तहसीलदार शरद घोरपडे, निफाड नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी डॉ. श्रीया देवचके यांनी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. निफाडचे मंडल अधिकारी बाळासाहेब निफाडे व तलाठी शंकर खंडांगळे यांनी घटनेचा पंचनामा केला.

--------------------

निफाड येथे अग्निशमन दलाचे वाहन मिळावे, याचा ठराव निफाड नगरपंचायतीच्या वतीने करण्यात येऊन त्याची संपूर्ण कार्यवाही पूर्ण करून प्रस्ताव तयार केला. हा प्रस्ताव आठ महिन्यांपूर्वी मंजुरीसाठी विभागीय आयुक्तांकडे पाठवण्यात आला आहे

- डॉ. श्रीया देवचके, मुख्याधिकारी, निफाड (०३ निफाड २)

070921\07nsk_28_07092021_13.jpg

०३ निफाड २

Web Title: Niphad lost Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.