निफाड नगरपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी ७९.४४ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 01:18 AM2018-07-16T01:18:50+5:302018-07-16T01:19:08+5:30

निफाड : निफाड नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ६च्या पोट- निवडणुकीसाठी एकूण ५०१ पैकी ३९८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी एकूण ७९.४४ टक्के मतदान झाले ़

Niphad Nagar Panchayat polling 79.44 percent polling | निफाड नगरपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी ७९.४४ टक्के मतदान

निफाड नगरपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी ७९.४४ टक्के मतदान

Next

निफाड : निफाड नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ६च्या पोट- निवडणुकीसाठी एकूण ५०१ पैकी ३९८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी एकूण ७९.४४ टक्के मतदान झाले ़
या निवडणुकीसाठी भाजपाच्या उमेदवार मोनाली शंकरराव वाघ आणि अपक्ष उमेदवार सुनीता बाळासाहेब मोगरे यांच्यात ही लढत होत आहे. दुपारी १२ पर्यंत अधूनमधून पाऊस हजेरी लावत असल्याने दोन्ही उमेदवारांना पावसापासून बचाव करण्यासाठी आसरा घ्यावा लागत होता़
दुपारनंतर मतदान बूथवर शुकशुकाट होता. दुपारी ३.३० ते ५.३० या दरम्यान फक्त १० इतके कमी मतदान झाले. ५०१ मतदानापैकी जे १०३ मतदान झाले नाही त्यात मयत, परगावी राहण्यास गेलेले आणि काही मतदारांचा शोधच लागला नाही अशा मतदारांचा समावेश होता. निफाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांच्या नेतृत्वाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सोमवारी सकाळी १० वाजता निफाड नगरपंचायत सभागृहात मतमोजणीला सुरुवात होऊन निकाल जाहीर केला जाईल. या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी संजय बागडे, सहायक निवडणूक अधिकारी संगीता नांदूरकर हे काम पाहत आहे़

Web Title: Niphad Nagar Panchayat polling 79.44 percent polling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.