विनायकदादा पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी निफाडला शोकसभेचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2020 01:02 IST2020-10-25T22:40:06+5:302020-10-26T01:02:01+5:30
निफाड : जेष्ठ नेते वनाधिपती विनायकदादा पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी निफाडकरांच्या वतीने वैनतेय विद्यालयात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.

जेष्ठ नेते वनाधिपती स्वर्गीय विनायकदादा पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित शोकसभेत बोलताना आप्पासाहेब उगावकर, सोबत वि. दा. व्यवहारे, ना. भा ठाकरे, रतन पाटील वडघुले.
निफाड : जेष्ठ नेते वनाधिपती विनायकदादा पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी निफाडकरांच्या वतीने वैनतेय विद्यालयात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी व्यासपीठावर ॲड. आप्पासाहेब उगावकर, वि. दा. व्यवहारे, रतन पाटील वडघुले, ॲड. ना. भा ठाकरे आदी मान्यवर होते.
याप्रसंगी अनेक मान्यवरांनी दादांच्या जीवनातील कार्य, आठवणींना उजाळा दिला दिलदार मनाचे, राजकीय मुत्सुद्दी, सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व असणारे विनायकदादा हे बौध्दिक, सामाजिक, राजकीय, साहित्य, कला या क्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते असा उल्लेख विविध वक्त्यांच्या भाषणात आला.
याप्रसंगी राजाभाऊ शेलार, अनिल कुंदे, नंदलाल बाफना, शिवाजी ढेपले, मधुकर शेलार, ॲड. अशोक निकम, रामनाथ कराड, डॉ. उत्तम डेर्ले, काशिनाथ हिरे, विनायक शिंदे, मधुकर शिंदे आदींजी श्रध्दांजलीपर भाषणे झाली.
याप्रसंगी मधुकर राऊत, विश्वास कराड, दत्ता उगावकर, रामदास व्यवहारे, ॲड प्रवीण ठाकरे, इरफान सय्यद, नूर शेख, नईम पठाण, दिलीप कापसे, बाळासाहेब सरोदे, सुनील चिखले, वाय. डी. लोखंडे, हेमंत खडताळे, सुहास सुरळीकर, बाळासाहेब कापसे, एकनाथ चकोर, संपत कराड, रमेश जाधव, एस. एम. सोनवणे, डी. बी. वाघ, एस. पी. गोरवे, बी. आर. सोनवणे, श्याम पगारे, तनविर राजे आदींसह विविध संस्था, पक्ष, संघटनेचे कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.