निफाड : शेतकरी आंदोलन समितीतर्फे मागण्यांचे निवेदन आमदारांच्या घरासमोर ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 12:14 AM2018-05-27T00:14:03+5:302018-05-27T00:14:03+5:30
ओझर : नाशिक जिल्हा शेतकरी आंदोलन समितीच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांना विधिमंडळात वाचा फोडावी यासाठी निफाडचे आमदार अनिल कदम यांच्या घरासमोर सत्याग्रह करण्यात येऊन निवेदन देण्यात आले.
ओझर : नाशिक जिल्हा शेतकरी आंदोलन समितीच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांना विधिमंडळात वाचा फोडावी यासाठी निफाडचे आमदार अनिल कदम यांच्या घरासमोर सत्याग्रह करण्यात येऊन निवेदन देण्यात आले.
संपूर्ण देशातील शेतकरी कर्जमुक्त व्हावा तसाच शेतमालाच्या उत्पादन खर्चाच्या दीडपटीचा हमीभाव स्वामिनाथन यांनी सुचविलेल्या सूत्रांनुसार मिळावा त्याचप्रमाणे शेतकºयांना कर्जमुक्ती व हमीभाव कायद्यान्वये मिळण्यासाठी यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्यात यावे अशी मागणी सरकारला करावी यासाठी नाशिक जिल्हा शेतकरी आंदोलन समितीच्या वतीने स्वाभिमान शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले यांच्या नेतृत्वाखाली कदम यांच्या निवासस्थानी सत्याग्रह करण्यात आले.
कदम हे मुंबईत असल्याने त्यांच्या वतीने त्यांचे वडील साहेबराव कदम व मातोश्री सुमनताई कदम यांनी हे निवेदन स्वीकारले. यावेळी स्वाभिमान शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष हंसराज, साहेबराव मोरे, सुधाकर मोगल, रवींद्र मोरे, नाना ताकाटे, जयराम जाधव, शांताराम मोरे, शरद गायकवाड, संपत सरोदे, अनिल गायकवाड, राजेंद्र गायकवाड, साहेबराव पानसरे, रमेश मोगल, पुंजाराम कडलग, माधवराव रोटे, भाऊसाहेब तासकर, निवृत्ती गारे, दत्तू मुरकुटे यांच्यासह प्रदीप अहिरे, सुनील कदम, क्रांती कदम, प्रकाश महाले, प्रशांत पगार, नितीन काळे, नरेंद्र थोरात उपस्थित होते. यावेळी ओझर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार उपाशे, उपनिरीक्षक प्रकाश बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवला होता.