निफाड : नगराध्यपदी शिवसेनेचे होळकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 12:03 AM2017-08-04T00:03:50+5:302017-08-04T00:09:24+5:30
निफाड : निफाडच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेचे मुकुंद नानासाहेब होळकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निफाडचे नगराध्यक्ष राजाभाऊ शेलार यांनी आवर्तन पद्धतीने राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक झाली. निफाड नगरपंचायतीवर भाजपा-सेना युतीची सत्ता आहे.
निफाड : निफाडच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेचे मुकुंद नानासाहेब होळकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
निफाडचे नगराध्यक्ष राजाभाऊ शेलार यांनी आवर्तन पद्धतीने राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक झाली. निफाड नगरपंचायतीवर भाजपा-सेना युतीची सत्ता आहे. सकाळी १० वाजता निवडणूक प्रक्रियेस प्रारंभ झाला. पीठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार विनोद भामरे यांनी, तर सहायक म्हणून निफाड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी काम पाहिले. मुकुंद होळकर यांनी नगराध्यक्षपदासाठी दोन अर्ज भरले होते. पहिल्या अर्जावर सूचक म्हणून राजाभाऊ शेलार, तर अनुमोदक म्हणून आनंद बिवलकर यांचे नाव होते. दुसºया अर्जावर सूचक म्हणून सुनीता कुंदे यांचे, तर अनुमोदक म्हणून एकनाथ तळवाडे यांचे नाव होते. मुकुंद होळकर यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी भामरे यांनी निफाडच्या नगराध्यक्षपदी मुकुंद होळकर यांची निवड झाल्याचे घोषित केले. निवडप्रक्रि येप्रसंगी उपनगराध्यक्ष चारुशीला कर्डिले, नगरसेवक आनंद बिवलकर, अनिल कुंदे, सुनीता कुंदे, स्वाती गाजरे, नयना निकाळे, एकनाथ तळवाडे, जावेद शेख, लक्ष्मीबाई पवार, अलका पवार, मंगल वाघ, नूरजहा पठाण, देवदत्त कापस आदी नगरसेवक सहभागी झाले होते. निवडप्रक्रिया पार पडल्यानंतर नगरपंचायतीच्या सभागृहात होळकर यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ शेलार, निफाड नगरपंचायतीचे स्वीकृत नगरसेवक दिलीप कापसे, संदीप जेऊघाले, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब क्षीरसागर, पंचायत समिती सदस्य शिवा सुराशे, सोमनाथ पानगव्हाणे, शिवसेना तालुकाप्रमुख उत्तम गडाख, उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे, इरफान सय्यद, भाजपा तालुकाध्यक्ष संजय वाबळे, शंकर वाघ, वैकुंठ पाटील, संजय कुंदे, रमेश जेऊघाले, विलास मत्सागर, लक्ष्मण निकम, आसिफ पठाण, प्रभाकर मापारी आदींसह शिवसेना, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.