निफाड तालुका गारठला, कुंदेवाडी येथे ७.२ किमान तापमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 02:42 PM2018-12-17T14:42:42+5:302018-12-17T14:44:35+5:30

लासलगाव :- जम्मू-काश्मीर ,हिमाचल प्रदेश येथे हिमवर्षाव होत असल्याने उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाºयांमुळे राज्यातील तपमानात घसरण होत नाशिक जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत किमान तापमानात घट झाली आहे.

Niphad taluka at Gartal, Kundewadi at 7.2 degree minimum | निफाड तालुका गारठला, कुंदेवाडी येथे ७.२ किमान तापमान

निफाड तालुका गारठला, कुंदेवाडी येथे ७.२ किमान तापमान

googlenewsNext

लासलगाव :- जम्मू-काश्मीर ,हिमाचल प्रदेश येथे हिमवर्षाव होत असल्याने उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाºयांमुळे राज्यातील तपमानात घसरण होत नाशिक जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत किमान तापमानात घट झाली आहे. निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथे ७.२ अंश सेल्सिअस किमान तपमानाची निच्चांकी नोंद करण्यात आली आहे. थंडी अजून दोन दिवस अशीच राहणार असल्याचे हवामान निरीक्षक रमेश मानकर यांनी सांगितले . गेल्या चार ते पाच दिवसांपासून थंड वाºयांमुळे निफाड तालुका गारठून निघाला आहे . तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान विभागात आज सोमवारी या थंडीत हंगामातील ७.२ अंश सेल्सिअस किमान तपमानाची निच्चांकी नोंद झाली आहे . या महिन्यात पारा घसरत १० डिसेंबर रोजी ९.६ अंश सेल्सिअस नोंद तर ११ डिसेंबर रोजी ७.६ अंश सेल्सिअस सर्वात सर्वाधिक थंडीची नोंद झाली होती. पुन्हा पारा वाढत १३ अंश सेल्सिअसवर गेला होता. १६ डिसेंबर रोजी ११.२ अंश सेल्सिअस नोंद झाली तर दि.१७ रोजी या हंगामातील राज्यातील सर्वात निच्चांकी ७.२ नोंद झाली आहे . कडाक्याच्या थंडीने तालुका गारठल्याने ठिकठिकाणी शेकोट्या पेटवून नागरिकांनी उब मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे . वाढत्या थंडीमुळे गहू ,हरभरा, कांदा ,लसूण ,ज्वारी पिकांना फायदेशीर ठरत असेल मात्र थंडी अशी ठीकून राहिली द्राक्षबागांवर भुरी ,डाऊनी या रोगांचा प्रदुर्भाव होण्याची शक्यता वाढली आहे .याशिवाय पक्क होत असलेल्या बागांचे मनी तडकण्याचेही प्रमाण वाढण्याची स्थिती निर्माण झाल्याने द्राक्ष उत्पादकांच्या अडचणीत वाढ झाली आहे .

Web Title: Niphad taluka at Gartal, Kundewadi at 7.2 degree minimum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक