निफाडला लोकन्यायालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 06:41 PM2019-12-17T18:41:14+5:302019-12-17T18:41:40+5:30

प्रलंबित दावे व केसेस समजुतीने मिटाव्यात तसेच वादावर तत्काळ तोडगा काढण्यासाठी लोकन्यायालय हे प्रभावी माध्यम असल्याचे प्रतिपादन निफाडचे जिल्हा व सत्र न्या. आर. जी. वाघमारे यांनी केले. निफाड येथे शनिवारी (दि. १४) झालेल्या लोकन्यायालयाच्या प्रारंभी न्या. वाघमारे बोलत होते.

Niphad to the Tribunal | निफाडला लोकन्यायालय

निफाड येथील लोकन्यायालयात पक्षकारांशी संवाद साधताना न्या. आर. जी. वाघमारे.

Next

लासलगाव : प्रलंबित दावे व केसेस समजुतीने मिटाव्यात तसेच वादावर तत्काळ तोडगा काढण्यासाठी लोकन्यायालय हे प्रभावी माध्यम असल्याचे प्रतिपादन निफाडचे जिल्हा व सत्र न्या. आर. जी. वाघमारे यांनी केले.
निफाड येथे शनिवारी (दि. १४) झालेल्या लोकन्यायालयाच्या प्रारंभी न्या. वाघमारे बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा व सहायक सत्र न्या. एस.टी. डोके, अतिरिक्त जिल्हा न्या. पी.डी. दिग्रसकर, दिवाणी वरिष्ठ स्तर न्या. एस. एस. जहागीरदार, वरिष्ठ स्तर न्या. एस. बी. काळे, न्या. एस. डब्ल्यू. उगले, एम. एस. कोचर, प्राची गोसावी, निफाडचे पोलीस उपअधीक्षक माधव रेड्डी, लासलगावचे सहायक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे, निफाड वकील संघाचे
उपाध्यक्ष ए. व्ही. आवारे, शरद नवले, सचिव रामेश्वर कोल्हे, खजिनदार चेतन घुगे, गौरव शिंदे, जिल्हा
सहायक सरकारी वकील रमेश कापसे, आर. बी. शिंदे, पोलीस प्रॉसिक्युटर तडवी, जिल्हा न्यायालयाचे अधीक्षक के. एफ. क्षीरसागर आदी उपस्थित होते. या अदालतीमध्ये एकूण आठ पॅनलची बैठक व्यवस्था करण्यात आली होती.
लोकअदालतीत निफाड न्यायालयांतील प्रलंबित एकूण ८३४ प्रकरणे व दावा पूर्व २५११ प्रकरणे ठेवण्यात आली होती.

Web Title: Niphad to the Tribunal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.