निफाडला श्रीराम जन्मोत्सव साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 12:32 AM2019-04-14T00:32:02+5:302019-04-14T00:33:02+5:30
निफाड : भजन आणि धार्मिक कार्यक्रमांनी निफाड येथील श्री माणकेश्वर चौकातील श्रीराम मंदिरात भक्तिभावाने श्रीराम जन्मोत्सव साजरा झाला़ रामनवमीनिमित्त श्रीराम मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
निफाड : भजन आणि धार्मिक कार्यक्रमांनी निफाड येथील श्री माणकेश्वर चौकातील श्रीराम मंदिरात भक्तिभावाने श्रीराम जन्मोत्सव साजरा झाला़
रामनवमीनिमित्त श्रीराम मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. श्रीराम मंदिरातील पंचधातूच्या श्रीराम, सीता, लक्ष्मण आणि हनुमानाच्या मूर्तींवर अभिषेकादि पूजा करण्यात आली. पुरोहित पद्माकर पाटील यांनी चैत्र प्रतिपदा ते नवमीपर्यंत नैमित्तिक पूजा, अभिषेक केला. या उत्सवाचे हे ४० वे वर्ष आहे. यावर्षी श्रीराम जय जय राम जय जय रामचा जप करण्यात आला़
शनिवारी (दि. १३) सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत महापूजा, अभिषेक करण्यात येऊन हभप सूर्यभाननंद महाराज यांचे रामजन्मावर काल्याचे कीर्तन झाले आणि दुपारी १२ वाजता श्रीराम जन्मोत्सव साजरा झाला. भाविकांनी प्रभू रामचंद्र भगवान की जय असा जयजयकार केला आणि हार-फुले वाहून यावेळी महाआरती करण्यात आली. महिलांनी भजन व पाळणा सादर केला. यानंतर महाप्रसादाचे भाविकांना वाटप करण्यात आले.श्रीरामनवमीनिमित्त गेल्या सात दिवसांपासून श्रीराम मंदिरात राम जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते. प्रतिपदेच्या दिवसापासून रोज अभिषेक, पूजा, आरती केली जात होती. दुपारी सप्तशती पाठ वाचन तसेच राम जन्मोत्सवानिमित्त गेल्या सात दिवसांपासून रामायणाचार्य भास्कर महाराज रसाळ यांच्या रसाळ वाणीतून श्रीरामकथेचे आयोजन करण्यात आले होते.