निफाडला भाजपाचा सेनेला धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 12:48 AM2018-01-24T00:48:13+5:302018-01-24T00:48:59+5:30

नगरपंचायतीत शिवसेना- भाजपा युतीच सत्ता असताना विषय समित्या सभापतिपदाच्या निवडणुका बिनविरोध करताना ऐनवेळी भाजपाने शिवसेनेला धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेसला बरोबर घेऊन चार पैकी दोन सभापतिपदे पदरात पाडून घेतली आहेत. राष्ट्रवादी कॉँग्रेस व कॉँग्रेस यांना प्रत्येकी एक समिती मिळाली. या नव्या आघाडीमुळे नगरपंचायतीच्या राजकारण ढवळून निघाले आहे.

Niphadala pushing BJP senala | निफाडला भाजपाचा सेनेला धक्का

निफाडला भाजपाचा सेनेला धक्का

Next

निफाड : नगरपंचायतीत शिवसेना- भाजपा युतीच सत्ता असताना विषय समित्या सभापतिपदाच्या निवडणुका बिनविरोध करताना ऐनवेळी भाजपाने शिवसेनेला धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेसला बरोबर घेऊन चार पैकी दोन सभापतिपदे पदरात पाडून घेतली आहेत. राष्ट्रवादी कॉँग्रेस व कॉँग्रेस यांना प्रत्येकी एक समिती मिळाली. या नव्या आघाडीमुळे नगरपंचायतीच्या राजकारण ढवळून निघाले आहे.
विषय समिती सदस्य व सभापती पदाच्या निवडणुकीसाठी निफाडचे प्रभारी तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. त्यांना नगरपंचायतचे मुख्य अधिकारी किशोर चव्हाण यांनी साहाय्य केले. विषय समितीच्या एकूण चारपैकी तीन समित्यांच्या सभापतिपदासाठी प्रत्येकी एकेक नामनिर्देशनपत्र  दाखल झाल्याने समिती सभापतिपदाची निवडणूक बिनविरोध झाली.
भाजपाच्या स्वाती गाजरे या शिक्षण, आरोग्य, महिला व बाल कल्याण विभागाच्या सभापतिपदी, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे देवदत्त कापसे यांची पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापतिपदी बिनविरोध निवड झाली. काँग्रेस आय पक्षाच्या नयना निकाळे या बांधकाम समितीच्या सभापतिपदी बिनविरोध निवडून आल्या. भाजपाच्या उपनगराध्यक्ष मंगला शंकरराव वाघ या नियोजन समितीच्या पदसिद्ध सभापती आहेत. या निवड प्रक्रियेप्रसंगी नगराध्यक्ष मुकुंद होळकर, उपनगराध्यक्ष मंगल वाघ, नगरसेवक राजाभाऊ शेलार, अनिल कुंदे, देवदत्त कापसे, आनंद बिवलकर, किरण कापसे,जावेद शेख, एकनाथ तळवाडे, चारुशीला कर्डिले, लक्ष्मी पवार, अलका पवार, सुनीता कुंदे, नयना निकाळे, शिरीन मणियार, नूरजहाँ पठाण, स्वीकृत नगरसेवक दिलीप कापसे, संदीप जेऊघाले उपस्थित होते.  १ नोव्हेम्बर २०१५ रोजी झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत भाजप सेनेने विजय मिळवल्याने या युतीने कॉग्रेस, बसपा यांना एकत्रित करीत १७ पैकी १३ नगरसेवकांचे बहुमत करीत सत्ता मिळवली होती निफाड नगरपंचायतीवर शिवसेना भाजप युतीची सत्ता आहे .

Web Title: Niphadala pushing BJP senala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.