राष्ट्रवादीच्या वतीने निफाडला महागाईच्या विरोधात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 08:23 PM2021-07-05T20:23:15+5:302021-07-06T00:16:42+5:30
निफाड : केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅस व रासायनिक खतांच्या किमतीत भरमसाट वाढ केल्याने या महागाईच्या विरोधात निफाड तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले.
निफाड : केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅस व रासायनिक खतांच्या किमतीत भरमसाट वाढ केल्याने या महागाईच्या विरोधात निफाड तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्यावतीने निफाडचे तहसीलदार शरद घोरपडे यांना निवेदन देण्यात आले. सरकारने पेट्रोल डिझेल गॅस व रासायनिक खतांच्या किमतीत भरमसाठ वाढ केल्याने सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी अक्षरशः होरपळून निघाला आहे. या वाढलेल्या किमतीमुळे सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी आर्थिकदृष्ट्या अक्षरश मेटाकुटीला आला आहेत. या वाढलेल्या महागाईचा निषेध करत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
याप्रसंगी राजेंद्र डोखळे यांचे भाषण झाले. आंदोलनात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सागर कुंदे , राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र बोरगुडे, दिलीप कापसे, सिद्धार्थ वनारसे, जावेद शेख, महेश कुटे, अनिल बोरस्ते, सुनीता राजळे, अश्विनी मोगल, भूषण शिंदे, संदीप पवार, भारत पगार, नारायण पोटे, राजेंद्र सांगळे, रमेश मंडलिक, स्वाती कमानकर, शाम निरभवणे गणेश गोहड, भूषण धनवटे, डॉ. घायाळ आदींना सहभाग घेतला.