निफाडला आशा स्वयंसेविकांचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:10 AM2021-06-19T04:10:35+5:302021-06-19T04:10:35+5:30

निफाड पंचायत समिती कार्यालय आवारात आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी निदर्शने करून गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन ...

Niphadla Asha Swayamsevak's bear movement | निफाडला आशा स्वयंसेविकांचे धरणे आंदोलन

निफाडला आशा स्वयंसेविकांचे धरणे आंदोलन

Next

निफाड पंचायत समिती कार्यालय आवारात आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी निदर्शने करून गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले. कोविड कामाचा ताण कमी करणे, केंद्र व राज्य सरकार आर्थिक शोषण करीत आहे ते बंद करणे, आशा स्वयंसेविकांना १८ हजार, तर गटप्रवर्तकांना २२ हजार प्रतिमहा वेतन देण्यात यावे, माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेचा दुसऱ्या टप्प्यात केलेल्या कामाचा मोबदला देण्यात यावा या व इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी जिल्हा संघटक विजय दराडे , उपाध्यक्ष मनीषा खैरनार, तालुकाध्यक्ष रूपाली सानप, वैशाली जाधव, छाया जगताप यासह मोठ्या संख्येने आशा स्वयंसेविका व आशा सुपरवायझर ( गटप्रवर्तक) उपस्थित होत्या.

-----------------

निफाड पंचायत समिती येथे धरणे आंदोलन करताना आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक. (१८ निफाड)

===Photopath===

180621\18nsk_33_18062021_13.jpg

===Caption===

१८ निफाड

Web Title: Niphadla Asha Swayamsevak's bear movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.