निफाडला छावा संघटनेची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 01:05 IST2021-06-29T22:43:56+5:302021-06-30T01:05:13+5:30
निफाड : अखिल भारतीय छावा संघटनेची बैठक मंगळवारी (दि.२९) रानवड येथे झालेल्या बैठकीत छावा संघटनेची निफाड तालुका कार्यकारिणी निवडण्यात आली.

निफाडला छावा संघटनेची बैठक
ठळक मुद्देनिफाड तालुकाध्यक्षपदी अक्षय कुंदे यांची निवड करण्यात आली.
निफाड : अखिल भारतीय छावा संघटनेची बैठक मंगळवारी (दि.२९) रानवड येथे झालेल्या बैठकीत छावा संघटनेची निफाड तालुका कार्यकारिणी निवडण्यात आली.
निफाड तालुकाध्यक्षपदी अक्षय कुंदे, युवक तालुकाध्यक्ष सार्थक कानडे, विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष साजन ढोमसे, विद्यार्थी आघाडी तालुका सचिव शुभम गोळे, लासलगांव शहराध्यक्ष केदार शिंदे यांची निवड करण्यात आली.
या बैठकीत अखिल भारतीय छावा संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष जगदिश जाधव यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी अभिजित औताडे, दीपक हांडगे, प्रवीण तनपुरे, राजाभाऊ वाघले, पिंटू सावंत व छावा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.