निफाडला थंडीचा कहर; नीचांकी तापमानाची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 01:44 AM2018-12-11T01:44:50+5:302018-12-11T01:45:17+5:30

तालुक्यात सोमवारी  (दि. १०) ९.६ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. थंडीने निफाड तालुका गारठून गेला असून, यावर्षीच्या नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. 

 Niphadla cold weather; Low Temperature Temperature | निफाडला थंडीचा कहर; नीचांकी तापमानाची नोंद

निफाडला थंडीचा कहर; नीचांकी तापमानाची नोंद

Next

निफाड : तालुक्यात सोमवारी  (दि. १०) ९.६ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. थंडीने निफाड तालुका गारठून गेला असून, यावर्षीच्या नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे.  मागच्या महिन्यात निफाड तालुक्यात १० अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद झाली होती. गेले काही दिवस वातावरणात उष्मा वाढला होता. गेल्या ४ ते ५ दिवसांपासून वातावरणात गारठा वाढत असून, सोमवारी पहाटे पारा ९.६ अंश सेल्सिअसवर पोहोचला. त्यामुळे तालुका गारठला असून, शेतकरी, ऊसतोड कामगारांनी शेकोट्या  पेटवून ऊब मिळवण्याचा प्रयत्न केला. ही थंडी गहू, कांदे या पिकांच्या दृष्टीने  पोषक ठरणार आहे. सोमवारी  सायंकाळी वातावरणात गारठा वाढला होता. रात्रीही थंडीचे प्रमाण वाढले होते.
मुंबईसुद्धा गारेगार !
मुंबई : मुंबई व महाबळेश्वरचे किमान तापमान सोमवारी १६ अंश नोंदविण्यात आले आहे. सोमवारी राज्यात सर्वांत कमी किमान तापमान निफाड येथे १२.८ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.

Web Title:  Niphadla cold weather; Low Temperature Temperature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.