निफाडला स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 01:23 AM2018-12-17T01:23:16+5:302018-12-17T01:23:53+5:30
शेतकऱ्यांच्या मुलांनी स्पर्धा परीक्षा देताना स्वत:वर विश्वास ठेवावा, जबाबदारी उचलण्याची हिंमत दाखवा, घराचा उंबरठा ओलांडण्याचे धाडस दाखवा, जिद्द बाळगा, आपल्या निर्णयावर ठाम राहा. कठोर मेहनत सुनियोजन करा, असे प्रतिपादन लोकसेवा आयोग स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करणारे आदित्यराजे पवार यांनी केले.
निफाड : शेतकऱ्यांच्या मुलांनी स्पर्धा परीक्षा देताना स्वत:वर विश्वास ठेवावा, जबाबदारी उचलण्याची हिंमत दाखवा, घराचा उंबरठा ओलांडण्याचे धाडस दाखवा, जिद्द बाळगा, आपल्या निर्णयावर ठाम राहा. कठोर मेहनत सुनियोजन करा, असे प्रतिपादन लोकसेवा आयोग स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करणारे आदित्यराजे पवार यांनी केले.
निफाड येथील कर्मवीर गणपत दादा मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे मविप्र व बळीराजा फाउण्डेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून पवार बोलत होते.
या शिबिराचे उदघाटन जि. प. सदस्य अमृता पवार यांनी केले. याप्रसंगी व्यासपीठावर बळीराजा फाउण्डेशनचे संस्थापक अध्यक्ष व स्पर्धा परीक्षा अभियानाचे निमंत्रक हंसराज वडघुले, गटविकास अधिकारी अभिजीत हजारे, प्राचार्य डॉ. आर.एन. भवरे माधव गिते , प्रभाकर वाघ, संपत डुंबरे,सुधाकर मोगल,नाना बच्छाव, डॉ. उत्तम डेर्ले, उपप्राचार्य ए. एल. गायकवाड, प्रा. सुनीता उफाडे, मंजूषा भंडारे , वैशाली गिते, प्रा. बी. सी .महाले ,साहेबराव मोरे, नितीन कोरडे, शिवराम रसाळ, सुभाष
गायकवाड, योगेश वाघ, प्रा. आहेर, उपस्थित होते. अभियान समन्वयक कवि संदीप जगताप यांनी प्रास्ताविकातून या अभियानाची माहिती दिली.
गटविकास अधिकारी अभिजित हजारे यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कसा असतो, त्याचे नियोजन कसे करावे या बद्दल मार्गदर्शन केले. रु पेश जाधव यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थी न्यूनगंड न ठेवता पुढे यावे, असे ्र्रेआवाहन केले. याप्रसंगी जि. प. सदस्य अमृता पवार म्हणाल्या की, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन ही कौतुकास्पद संकल्पना असून हे अभियान सातत्याने पुढे चालत राहावे तसेच यातून मोठ्या संख्येने अधिकारी घडावेत यासाठी संस्थेच्या पातळीवर तसेच वैयिक्तकरीत्या सर्वतोपरी मदत करण्यास मी
कटिबद्ध असून, लवकरच तालुक्यातील इतर महाविद्यालयात हा उपक्र म राबवला जाईल असे सांगत
विद्यार्थ्यांत ऊर्जा निर्माण होणे गरजेचे आहे, असे सांगितले.
विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून त्या दिशेने सतत प्रयत्न करावा.टाकीचे घाव सोसल्या शिवाय देवपण येत नाही. त्या प्रमाणे सतत प्रयत्न केल्याशिवाय यश मिळत नाही असे सांगितले.
याप्रसंगी बळीराजा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व स्पर्धा परीक्षा अभियानाचे निमंत्रक हंसराज वडघुले , गटविकास अधिकारी अभिजित हजारे , अमृता पवार , प्राचार्य डॉ. आर.एन.भवरे यांची भाषणे झाली
कार्यक्र माचे सूत्रसंचालन प्रा.श्रीमती आर.एस.मोहोड यांनी केले.