निफाडला प्रजासत्ताक दिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2021 06:52 PM2021-01-27T18:52:03+5:302021-01-27T18:52:44+5:30
निफाड : निफाड व परिसरात विविध संस्था, शाळा तसेच शासकीय कार्यालयात भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. निफाड तहसील येथे प्रांत डॉ. अर्चना पठारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी तहसीलदार शरद घोरपडे आदींसह अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
निफाड : निफाड व परिसरात विविध संस्था, शाळा तसेच शासकीय कार्यालयात भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. निफाड तहसील येथे प्रांत डॉ. अर्चना पठारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी तहसीलदार शरद घोरपडे आदींसह अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
वैनतेय विद्यालयात विद्यालयाचे प्राचार्य डी. बी. वाघ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे विश्वस्त वि. दा. व्यवहारे, रतन पाटील वडघुले, किरण कापसे, राजेंद्र राठी, दिलीप वाघवकर, मधुकर राऊत, उपप्राचार्य एस. पी. गोरवे, पर्यवेक्षक बी. आर. सोनवणे, विभाग प्रमुख प्रा. राजेंद्र सूर्यवंशी, वैनतेय पर्यवेक्षक पल्लवी सानप , वैनतेय प्राथमिक विद्या मंदिराच्या मुख्याध्यापिका सुजाता तनपुरे,वैनतेय शिशुविहार मंदिराच्या मुख्याध्यापक प्रसन्ना कुलकर्णी आदी उपस्थित होते.
मातोश्री जसोदाबाई सोनी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत संस्थेचे विश्वस्त चंद्रभान गीते यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ शेलार, संस्थेचे विश्वस्त शशांक सोनी,अशोक कापसे, कमलाकर कहाणे, मुख्याध्यापक ज्ञानदेव ढोमसे, मुख्याध्यापक नितीन कडलग व कर्मचारी उपस्थित होते,
निफाड उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ तांबे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
निफाड पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक रंगराव सानप यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कुंदेवाडी वीज वितरण कंपनी कार्यालय येथे वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता बकंट सुरवसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
श्री माणकेश्वर वाचनालयात अध्यक्ष मधुकर शेलार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी उपाध्यक्ष प्रवीण ठाकरे, हिशोब तपासनीस दत्ता उगावकर, सरचिटणीस, तनविर राजे, राजेंद्र खालकर, सुजाता तनपुरे, सुनील चिखले, राहुल नागरे आदी उपस्थित होते, येथील जि. प शाळा निफाड न 1 या शाळेत निफाडचे गटशिक्षणाधिकारी के. व्ही.तुंगार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ,याप्रसंगी मुख्याध्यापक निलेश शिंदे, व शिक्षक ,पालक उपस्थित होते
निफाड पं.स. येथे प. स .च्या सभापती रत्नाताई संगमनेरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. याप्रसंगी प. स. सदस्य, अधिकारी उपस्थित होते.
निफाड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित कॉग्रेस भवन येथे करंजी गावच्या ग्रामपंचायत सदस्य आश्विनी अडसरे यांच्या हस्ते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी निफाड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मधुकर शेलार, जिल्हा कॉग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश अडसरे, पुंजा तासकर, संपत कराड, नयना निकाळे, सुनील निकाळे, प्रवीण तनपुरे, राजेश लोखंडे, नंदू कापसे, मधुसूदन आव्हाड आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
निफाड नगरपंचायत येथे प्रशासक तथा निफाडच्या प्रांत डॉ. अर्चना पठारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
सरस्वती विद्यालय येथे समृध्दी चोरडिया यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी सरस्वती विद्यालय स्कूल कमिटीचे अध्यक्ष प्रवीण कराड, मुख्याध्यापक ज्योती भागवत यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते श्री लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था येथे जयंतीलाल दुधेडिया यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यातआले. याप्रसंगी पतसंस्थेचे अध्यक्ष अभिजित चोरडिया, उपाध्यक्ष प्रवीण कराड आदींसह संचालक उपस्थित होते. श्री शांतीलाल सोनी, निफाड नागरी सहकारी पतसंस्था येथे संचालक अंबादास गोळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात करण्यात आले. याप्रसंगी पतसंस्थेचे अध्यक्ष शशांक सोनी, उपाध्यक्ष मधुकर राऊत, मॅनेजर रामनाथ सानप आदींसह संचालक उपस्थित होते.
कर्मवीर गणपतदादा मोरे महाविद्यालयात प्राचार्य आर. एन. भवरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात करण्यात आले. निफाड अर्बन बँकेत ज्येष्ठ संचालक नंदलाल चोरडिया यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष रामदास व्यवहारे, उपाध्यक्ष संजय पोफळीया, ज्येष्ठ संचालक नंदलाल बाफना, राजेंद्र राठी आदीसह संचालक, मॅनेजर मोहन सुराणा उपस्थित होते. निफाड विविध कार्यकारी सोसायटी येथे सोसायटीचे अध्यक्ष रमेश जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. याप्रसंगी सोसायटीचे उपाध्यक्ष बापूसाहेब कुंदे,सचिव विठ्ठल कोटकर यांच्यासह सोसायटीचे संचालक उपस्थित होते.
निफाड तालुका सहाय्यक निबंधक कार्यालय व निफाड तालुका देखरेख संघ येथे तालुक्याचे सहाय्यक निबंधक अभिजीत देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. निफाड बसस्थानक येथे मधुकर कोष्टी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी वाहतूक नियंत्रक ए. एस. मन्सुरी, एस. एस. गवळी, आर. के. पीठे, एन. एल. बोठे आदी उपस्थित होते. .निफाड इंग्लिश स्कूल येथे निफाड इंग्लिश स्कूल कमिटीचे अध्यक्ष नंदलाल चोरडिया यांच्या यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .
याप्रसंगी मुख्याध्यापक एस. के. महाजन, पर्यवेक्षक पुंड आदींसह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. निफाड मार्केट यार्ड येथे लासलगाव कृ उ बा चे संचालक राजेंद्र डोखळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले