निफाडच्या नगरसेवकाची २० लाख रुपयांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2020 11:54 PM2020-11-23T23:54:11+5:302020-11-24T02:14:31+5:30

निफाड : मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या जमिनीच्या खटल्यात चांगला वकील देतो व तुमच्या बाजूने निकाल लावून देतो, असे सांगून २० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी निफाड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Niphad's corporator cheated of Rs 20 lakh | निफाडच्या नगरसेवकाची २० लाख रुपयांची फसवणूक

निफाडच्या नगरसेवकाची २० लाख रुपयांची फसवणूक

Next
ठळक मुद्देचांगला वकील लावून तुमच्या बाजूने निकाल लावून देतो, असे सांगून उकळले पैसे

निफाड : मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या जमिनीच्या खटल्यात चांगला वकील देतो व तुमच्या बाजूने निकाल लावून देतो, असे सांगून २० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी निफाड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत निफाडचे नगरसेवक किरण कापसे यांच्या फिर्यादीवरून निफाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. किरण कापसे यांची वडनेरभैरव येथील जमिनीच्या व्यवहाराची केस मुंबई उच्च न्यायालयात दाखल होती. या दरम्यान पंकज श्रीपादराव होळकर ( राहा. पिंपळगाव बसवंत ) यांनी किरण कापसे यांना न्यायालयाच्या आवारात भेटून केसचा निकाल तुमच्या बाजूने लावून देतो त्यासाठी चांगल्या वकिलाची नेमणूक करण्यासाठी ३० लाख रुपये लागतील, असे सांगून विश्वास संपादन केला.
यावेळी किरण कापसे यांनी डिसेंबर २०१९ मध्ये १५ लाख आरटीजीएसने व पाच लाख रुपये रोख असे एकूण २० लाख पंकज होळकर यांना दिले. त्यानंतर किरण कापसे यांनी वकिलांची भेट घालून द्या, असे म्हटल्यावर पंकज होळकर यांनी टाळाटाळ करण्यास सुरुवात केल्याने किरण कापसे यांना आपण फसलो गेल्याचे समजले. कापसे यांनी पंकज होळकर यांच्याकडे पैसे मागितले तेव्हा होळकर यांनी पाच लाख रुपये किरण कापसे यांच्या बँक खात्यावर जमा केले व उर्वरित १५ लाख रुपयांचे चेक दिले. मात्र ते चेक बँकेत वठले नाही. जमिनीच्या प्रकरणाबाबत वकील लावून देण्यासाठी पंकज होळकर यांनी २० लाख रुपये घेऊन कोणताही वकील दिला नाही व माझी फसवणूक केली आहे, अशा आशयाची फिर्याद किरण कापसे यांनी निफाड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीवरून निफाड पोलिसांनी संशयित पंकज होळकर यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे.

Web Title: Niphad's corporator cheated of Rs 20 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.