इंदिरानगरमध्ये गस्तीसाठी ‘निर्भय’ पथक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 12:57 AM2019-04-17T00:57:23+5:302019-04-17T00:57:48+5:30

आगामी सण-उत्सव आणि निवडणुकीच्या काळात इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत कुठल्याही प्रकारची कायदासुव्यवस्था धोक्यात येणार नाही, याबाबत सर्व शांतता समिती सदस्यांनी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे.

 'Nirbhay' squad for the motorcycle in Indiranagar | इंदिरानगरमध्ये गस्तीसाठी ‘निर्भय’ पथक

इंदिरानगरमध्ये गस्तीसाठी ‘निर्भय’ पथक

Next

इंदिरानगर : आगामी सण-उत्सव आणि निवडणुकीच्या काळात इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत कुठल्याही प्रकारची कायदासुव्यवस्था धोक्यात येणार नाही, याबाबत सर्व शांतता समिती सदस्यांनी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. कुठे काही अनुचित प्रकार किंवा संशयास्पद लोकांच्या हालचाली दिसून आल्यास जागरूक नागरिकाची भूमिका बजावून पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन उपआयुक्त अमोल तांबे यांनी केले आहे.
पोलीस ठाणे हद्दीत सकाळ-संध्याकाळ पोलिसांचे निर्भय पथक गस्त घालणार असल्याचेही त्यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीची धामधूम तसेच विविध प्रकारचे सण, उत्सव, जयंती, पुण्यतिथी साजरी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर इंदिरानगर पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक बोलाविण्यात आली होती. यावेळी शाळा व महाविद्यालय सुटण्याच्या वेळी विद्यार्थिनींना टवाळखोरांचा त्रास सहन करावा लागतो, तसेच परिसरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यावर काही तरुण मोटारसायकलची स्टंटबाजी करतात. किशोरनगर परिसरातील उद्यानामध्ये रात्रीच्या वेळी प्रेमीयुगुल अश्लील चाळे करत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी यावेळी बैठकीत केल्या. यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी विविध सूचना केल्या.
यावेळी सहायक पोलीस आयुक्त ईश्वर वसावे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील उपस्थित होते. दरम्यान, नगरसेवक सतीश सोनवणे, अ‍ॅड. श्याम बडोदे, उपनिरीक्षक अंकुश धांडगे, जगदीश गावित, रामचंद्र जाधव माणिक मेमाने, शोभा सोनवणे आदींनी उपस्थित राहून परिसरातील विविध समस्यांकडे लक्ष वेधले.
गुन्हेगारांवर वचकसाठी पथकाची गस्त
पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारांना वचक निर्माण करण्यास सुरु वात केली आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीत साध्या वेशात निर्भय पथक गस्त घालणार असून, टवाळखोरांवर कारवाई करण्यात येणार आहे. प्रत्येक नागरिक साध्या वेशातील पोलीस असून, त्यांच्या सहकार्यामुळे गुन्हेगारी कमी होण्यास मदत होणार होईल, असे अमोल तांबे म्हणाले.

Web Title:  'Nirbhay' squad for the motorcycle in Indiranagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.