जुनी पेन्शन हक्क संघटनेचा निर्धार मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2017 11:59 PM2017-08-06T23:59:53+5:302017-08-07T00:09:03+5:30
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचा पेठ तालुकास्तरीय निर्धार मेळावा आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
पेठ : महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचा पेठ तालुकास्तरीय निर्धार मेळावा आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
नोव्हेंबर २००५ नंतर शासकीय- निमशासकीय सेवेत रु जू झालेल्या कर्मचाºयांना केंद्र शासनाने अंशदायी पेन्शन योजना लागू केली असून, सदरची योजना रद्द करून जूनीच पेन्शन योजना लागू करावी यासाठी निर्धार मेळावा घेण्यात आला. यावेळी आमदार-खासदार यांना निवेदन देण्याऐवजी त्यांच्याकडूनच जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबतची शिफारस या कार्यक्रमात घेण्यात आली. कर्मचाºयांच्या पाठीशी उभे राहणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य असून, जुनी पेन्शन लागू करून लाखो कर्मचाºयांना न्याय मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा केला जाईल असे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी यावेळी सांगितले. मेळाव्यात संघटनेच्या वतीने आगामी काळात करावयाचे आंदोलने, अंशदायी पेन्शन योजनेची कपात बंद करणे, नकारपत्रके भरून घेणे, जिल्हा मेळाव्याची पूर्वतयारी आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस गोरख देवडे, दिंडोरी अध्यक्ष दिगंबर बागाड, निफाड अध्यक्ष नवनाथ सुरवडे, केंद्रप्रमुख मोतीराम सहारे, शिक्षक संघाचे अध्यक्ष आर.डी. शिंदे, आदिवासी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र भोये, राज्य संघटक प्रविण गायकवाड, तालुकाध्यक्ष अनिल सांगळे, संजय सुसलादे, नमन कुलकर्णी, चंद्रशेखर पठाडे, गणेश रोकडे, सतीश शंकरे, अक्षय ढोले, नवनाथ म्हस्के यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
रमेश वाघ यांनी सुत्रसंचलन केले.