निऱ्हाळे फत्तेपूरला कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 10:19 PM2021-04-27T22:19:15+5:302021-04-28T00:43:31+5:30
निऱ्हाळे : सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील निऱ्हाळे फत्तेपूर येथे कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस होत असलेली वाढ लक्षात घेऊन २७ एप्रिलपासून निऱ्हाळे फत्तेपूर येथे कडकडीत जनता कर्फ्यूचे आदेश देण्यात आले आहेत. सरपंच मनीषा यादव, उपसरपंच विष्णू सांगळे, कामगार पोलीस पाटील शिवाजी शिंदे, संगीता काकड यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

निऱ्हाळे फत्तेपूर येथे सर्वत्र १०० टक्के कडकडीत बंद पाळण्यात आला असून गावातील कोरोनाबाधितांची संख्या दररोज चार,पाच निघून ती ५० च्यावर गेली आहे. कोरोनाची साखळी कुठे तरी तुटावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होणे गरजेचे होते. म्हणून वावी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक सागर कोते यांनी सरपंच व उपसरपंच व कामगार पोलीस पाटील आणि पदाधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन यात कोरोना साखळी तोडण्याकरिता राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत चर्चा करून सर्वात प्रभावी उपाय म्हणून "जनता कर्फ्यू" लागू करण्याचे ठरविण्यात आले. याबाबत जनजागृती करण्यात आली. गावातील सर्व व्यवसाय करणाऱ्यांना ग्रामपंचायततर्फे नोटीस बजावली आहे. पाठीमागील दाराने विक्री करणाऱ्यावर ग्रामपंचायतीचे कारकून गणेश यादव, शिपाई दत्तात्रय कळसकर नजर ठेवून आहेत. मंगळवारपासून जनता कर्फ्यूचे कडकडीत बंद पाळण्यास सुरुवात झाली असून तो १ मेपर्यंत पाळण्यात येणार असल्याचे कामगार पोलिस पाटील शिवाजी शिंदे व संगीता काकड यांनी जाहीर केले.
१०० टक्के प्रतिसाद
निऱ्हाळे फत्तेपूर येथे सुरू असलेल्या जनता कर्फ्यूला १०० टक्के प्रतिसाद मिळाला असून गावातील सर्व व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. गावात आलेले ऊसतोडणी कामगार किराणा न मिळाल्याने गाव सोडून जाऊ लागले आहेत. जनता कर्फ्यू काळात सरपंचासह वावी पोलीस ठाण्याचे कर्मचारी, वावी व मऱ्हळ आरोग्य कर्मचारी वर्ग कार्यरत आहेत.