कळवण महाविद्यालयाच्या वतीने निर्माल्य संकलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 03:11 PM2018-09-21T15:11:03+5:302018-09-21T15:11:25+5:30

कळवण: कला , वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, कळवण (मानूर) येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने स्वयंसेवकांच्या मदतीने कळवण शहर व परिसरातील गणेश मंडळाकडील जमा झालेली निर्माल्य योग्य विल्हेवाट लावण्यासाठी महाविद्यालयाच्या वतीने निर्माल्य संकलन मोहीम राबविण्यात आली.

Nirmala compilation from Kalwan College | कळवण महाविद्यालयाच्या वतीने निर्माल्य संकलन

कळवण महाविद्यालयाच्या वतीने निर्माल्य संकलन

Next
ठळक मुद्देगणेश उत्सव काळात जमा झालेली निर्माल्य महाविद्यालयात संकलित करून त्याचा उपयोग गांढूळ खत निर्मितीसाठी केला जाणार आहे. तयार झालेले गांढूळ खत महाविद्यालयातील परिसरातील वृक्षांना वापरले जाते.



कळवण:
कला , वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, कळवण (मानूर) येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने स्वयंसेवकांच्या मदतीने कळवण शहर व परिसरातील गणेश मंडळाकडील जमा झालेली निर्माल्य योग्य विल्हेवाट लावण्यासाठी महाविद्यालयाच्या वतीने निर्माल्य संकलन मोहीम राबविण्यात आली.
गणेश उत्सव काळात जमा झालेली निर्माल्य महाविद्यालयात संकलित करून त्याचा उपयोग गांढूळ खत निर्मितीसाठी केला जाणार आहे. तयार झालेले गांढूळ खत महाविद्यालयातील परिसरातील वृक्षांना वापरले जाते. त्याच प्रमाणे निर्माल्य संकलनामुळें प्लास्टिक व जलप्रदुषण कमी होणार असून या निमित्त े स्वयंसेवकांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
निर्माल्य संकलनासाठी कळवण नगरपंचायतेचे गटनेते , उपनगराध्यक्ष कौतिक पगार यांचे सहकार्य लाभले असून
या उपक्र मात महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सौ. उषा शिंदे, एस.एम.पगार, बी. एस. पगार, श्रीमती एम.बी. घोडके, एस.जे.पवार, एम.डी. वाघ , एम.एन.पाटील व स्वयंसेवक यांनी सहभाग घेतला.


 

 

Web Title: Nirmala compilation from Kalwan College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.