त्र्यंबकेश्वरला निवृत्तीनाथांच्या यात्रेची जय्यत तयारी, नियोजन सुरू : पालिका राबविणार ‘निर्मळवारी’ उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 02:04 PM2018-01-01T14:04:18+5:302018-01-01T14:04:40+5:30
त्र्यंबकेश्वर: त्र्यंबकेश्वरला संत शिरोमणी श्रीनिवृत्तीनाथ महाराज यात्रेची पालिकेतर्फे जय्यत तयारी करण्यात येत असून त्यादृष्टीने नियोजन करण्यास सुरु वात केली आहे. येत्या ११ ते १३जानेवारी रोजी होणाºया यात्रेचा मुख्य दिवस पौष्टिक वैद्य एकादशी म्हणजेच १२ जानेवारी असा आहे.
त्र्यंबकेश्वर: त्र्यंबकेश्वरला संत शिरोमणी श्रीनिवृत्तीनाथ महाराज यात्रेची पालिकेतर्फे जय्यत तयारी करण्यात येत असून त्यादृष्टीने नियोजन करण्यास सुरु वात केली आहे. येत्या ११ ते १३जानेवारी रोजी होणाºया यात्रेचा मुख्य दिवस पौष्टिक वैद्य एकादशी म्हणजेच १२ जानेवारी असा आहे. अवघ्या महाराष्ट्रातील विविध संतांच्या दिंड्या भर थंडीची पर्वा न करता पायी पायी त्र्यंबकेश्वरकडे झेपावत आहेत. साधारणपणे पौष वैद्य दशमीला सर्व दिंड्या आपापल्या गडावर येऊन विसावतात. विशेष म्हणजे दर वर्षी यात्रेकरु ंची संख्या वाढत आहे.तशीच नवनवीन दिंड्यांची देखील भर पडत आहे. यात्रा कालावधीत वारकºयांना मार्गदर्शक सूचना फलकाद्वारे करु न तसेच स्वयंसेवक नेमुन कचरा, कचरापेटीत टाकावा. उघड्यावर शौचास न बसता शौचालयाचाच वापर करावा आदी सांगण्यात येणार आहे. त्यासाठी अनेक सेवाभावी संस्था या उपक्र मात स्वेच्छेने सहभागी झाल्या आहेत. तसेच सोशल मिडीयाचा देखील वापर करु न चित्रफिती दाखविल्या जात आहे. त्र्यंबक नगरपरिषदेच्या वतीने तयारी केली जात आहे. याशिवाय व्यावसायिक गाळे आखले जात आहेत. पोलीस यंत्रणा आरोग्य, वन, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी यात्रेत सहभाग असलेल्या यंत्रणांच्या प्रमुख अधिकाºयांच्या बैठका येत्या दोन ते तीन दिवसात जिल्हाधिकाºयांच्यावतीने विभागीय अधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली पालिका सभागृहात बोलावल्या जाणार आहेत.
-------------------------
पालिका देखील शासनाचे नवनवीन उपक्र म राबवित आहे. यावर्षीपासून पालिकेने ‘निर्मळवारी ’ हा उपक्र म राबविण्याचे ठरविलेले आहे. या उपक्र माचे स्वागत श्रीनिवृत्तीनाथ मंदिराच्या मंदीर जीर्णोद्धार भुमीपुजन सोहळा व भक्तनिवासाच्या उदघाटनाला मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस आले असतांना त्यांना या वर्षीपासुन निर्मलवारी उपक्र माबाबत समजले असतांना त्यांनी आपल्या भाषणात या उपक्र माचे तोंड भरु न स्वागत केले. निर्मल वारी उपक्र मासाठी मुख्यमंत्री यांनी ८० लाख रु पयांचा भरघोस निधी त्र्यंबक नगरपरिषदेला जाहीर केला आहे. वारकºयांच्या मुक्कामाच्या, गर्दीच्या ठिंकाणी फिरती शौचालये, स्वयंसेवक यांना नियुक्त करून वारकºयांची अध्यात्मिक वारी निर्मळ व अधिक आरोग्यदायी केली जाणार आहे.