निवृत्तिनाथ महाराज संस्थानचा वाद पोलिसांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 12:15 AM2019-11-30T00:15:07+5:302019-11-30T01:04:26+5:30
त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तिनाथ महाराज देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्ष निवडीवरून विश्वस्त आणि विरोधकांमध्ये राडा झाला होता. तो वाद आता पोलिसांपर्यंत गेला आहे. संदर्भात नवनिर्वाचित अध्यक्ष पवनकुमार भुतडा यांनी त्र्यंबकेश्वर पोलीस ठण्यात विरोधकांविरोधात तक्रार अर्ज दाखल केला आहे.
त्र्यंबकेश्वर : येथील संत निवृत्तिनाथ महाराज देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्ष निवडीवरून विश्वस्त आणि विरोधकांमध्ये राडा झाला होता. तो वाद आता पोलिसांपर्यंत गेला आहे. संदर्भात नवनिर्वाचित अध्यक्ष पवनकुमार भुतडा यांनी त्र्यंबकेश्वर पोलीस ठण्यात विरोधकांविरोधात तक्रार अर्ज दाखल केला आहे.
देवस्थान ट्रस्टमध्ये राडा करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी तक्रार अर्जात करण्यात आली आहे.
संत निवृत्तिनाथ मंदिरात गुरुवारी (दि.२८) बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्ष निवड मतदान पद्धतीने व्हावी, असा विषय घेण्यात आला. यावेळी विश्वस्त पवनकुमार भुतडा यांना सात, तर पुंडलिक थेटे यांना चार मते मिळाली. त्यावेळी थेटे यांच्याबरोबर आलेल्या समर्थकांपैकी जगन्नाथ तिदमे व अंबादास मुळाणे यांनी वाद घातला. तसेच सत्तारूढ विश्वस्तांना अर्वाच्च शब्दात शिवीगाळ केली व कार्यालयातील साहित्याची तोडफोड करण्यात आली. या प्रकाराचे सीसीटीव्ही चित्रीकरण झालेले आहे.