लासलगाव जैन संघाच्या संघपतीपदी नीतीन जैन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 00:38 IST2021-05-11T22:53:44+5:302021-05-12T00:38:23+5:30
लासलगाव : जैन श्रमण संघीय श्रावक संघ लासलगावच्या प्रभारी संघपती म्हणून जय आनंद ग्रुपचे सदस्य नितीन जैन यांची एकमताने निवड झाली.

लासलगाव जैन संघाच्या संघपतीपदी नीतीन जैन
ठळक मुद्देसंघपती रतनलाल राका यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर निवड.
लासलगाव : जैन श्रमण संघीय श्रावक संघ लासलगावच्या प्रभारी संघपती म्हणून जय आनंद ग्रुपचे सदस्य नितीन जैन यांची एकमताने निवड झाली.
संघपती रतनलाल राका यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर डॉ. विजयकुमार बागरेचा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत येथील कांदा निर्यातदार नितीन जैन यांची निवड करण्यात आली. यावेळी जैन श्रावक संघाचे उपाध्यक्ष सुरेश नाहाटा, सेक्रेटरी विनोद तातेड, फकिरचंद चोरडिया, जव्हरीलाल जांगडा, मनोज शिंगी, ओमप्रकाश राका, रमेश आबड, सुनील चंडालिया, तुषार बोरा, निखील छाजेड आदी पदाधिकारी उपस्थित होते.