नितीन पवार, झिरवाळ हरविल्याची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 01:26 AM2019-11-24T01:26:37+5:302019-11-24T01:27:26+5:30
महाराष्टतील राजकारणात भूकंप घडविणाऱ्या सत्तानाट्यात अजित पवार यांच्या वळचणीला गेलेले जिल्ह्यातील राष्टवादीचे तीन आमदार संपर्क क्षेत्राबाहेर असून, त्यांच्या भूमिकांबाबत संभ्रमाची स्थिती आहे.
नाशिक : महाराष्टतील राजकारणात भूकंप घडविणाऱ्या सत्तानाट्यात अजित पवार यांच्या वळचणीला गेलेले जिल्ह्यातील राष्टवादीचे तीन आमदार संपर्क क्षेत्राबाहेर असून, त्यांच्या भूमिकांबाबत संभ्रमाची स्थिती आहे. यातील कळवणचे आमदार नितीन पवार व दिंडोरीचे नरहरी झिरवाळ हे हरविल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे केली आहे. निफाडचे आमदार दिलीप बनकर यांनी नाशकात पत्रकार परिषद घेऊन आपण पक्षासोबत असल्याचे सांगितले असले तरी, त्यांच्याही संदिग्ध भूमिकेमुळे संभ्रमात भर पडली आहे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ मुंबईत शरद पवार यांच्या बरोबरीने सर्व आघाड्यांवर सहभागी असून, देवळालीच्या आमदार
सरोज अहिरे यांनीही मुंबईत झालेल्या बैठकीला हजेरी लावत आपण शरद
पवार यांच्याच सोबत असल्याचे स्पष्ट केले आहे.
नाशिक जिल्ह्याने पुलोदच्या प्रयोगापासून शरद पवारांची पाठराखण केलेली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील १५ पैकी सर्वाधिक
सहा जागा जिंकत जिल्ह्याने पुन्हा एकदा शरद पवार यांना पाठबळ दिले होते. शनिवारी (दि.२३) महाराष्टच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडून आली आणि राजभवनात झालेल्या सत्तासंपादनाच्या नाट्याचे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे, निफाडचे आमदार दिलीप बनकर आणि दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ हे स्वत: साक्षीदार बनल्याने जिल्ह्यातील राष्टवादीत फूट पडल्याच्या चर्चेला पुष्टी मिळाली. याशिवाय, राष्टÑवादीचे कळवणचे आमदार नितीन पवार आणि देवळालीच्या आमदार सरोज अहिरे हे प्रारंभी नॉट रिचेबल राहिल्याने जिल्ह्यात छगन भुजबळ वगळता पाचही आमदार अजित पवार यांच्या वळचणीला लागल्याचे चित्र निर्माण झाले. मात्र, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत पवार यांनी राष्टÑवादीत परतलेल्या अन्य तीन आमदारांना माध्यमांसमोर उभे केल्यानंतर वातावरण फिरले आणि माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर यांनी ट्विट करून आपण शरद पवार व पक्षासोबतच असल्याचा खुलासा केला, तर नितीन पवार यांनी फेसबुकवरून आपण शरद पवारांसोबत असल्याचे स्पष्ट केले. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार यांनीही नितीन पवार हे पक्षासोबतच असल्याचे स्पष्ट केले असले तरी ते नेमके कुठे आहेत, याबाबत अनभिज्ञता व्यक्त केली आहे. कोकाटे, पवार आणि झिरवाळ हे तिघेही मुंबईतील पक्षाच्या बैठकीसही अनुपस्थित राहिल्याचे दिसून आले. त्यांनी माध्यमांसमोर येण्याचेही टाळले असून ते संपर्क क्षेत्राबाहेर आहेत. त्यांना दिल्लीला रवाना करण्यात आल्याची चर्चा सोशल माध्यमावर होत आहे. तर दिलीप बनकर यांनी सायंकाळी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत आपण पक्षासोबत असल्याचा दावा करताना शरद पवार की अजित पवार यांच्यापैकी कोणासोबत, याचा मात्र उलगडा केला नाही. त्यामुळे बनकर यांच्या संदिग्ध भूमिकेमुळे त्यांच्याबद्दलचा संशय गडद झाला आहे.
देवळालीच्या आमदार सरोज अहिरे या शनिवारी सकाळपर्यंत नाशिकमध्येच होत्या. त्यांच्याशीही अजित पवारांकडून संपर्क साधल्याचे बोलले जाते. परंतु, सत्तानाट्यानंतर सावध झालेल्या राष्टवादीने तातडीने सरोज अहिरे यांच्याशी संपर्क साधत त्यांना मुंबईला नेण्यात आले. राष्टवादीच्या मनपातील माजी विरोधी पक्षनेत्या कविता कर्डक त्यांच्यासमवेत आहेत. अहिरे यांनीही आपण शरद पवार आणि पक्षासोबतच असल्याचे स्पष्ट केले आहे. सायंकाळी मुंबईत झालेल्या राष्टÑवादीच्या बैठकीला त्यांनी हजेरीही लावली. मात्र, अन्य चार आमदार अनुपस्थित राहिल्याने ते पक्षांतर्गत फूटीत अजित पवारांसोबत आहेत की काय, असा प्रश्न चर्चिला जात आहे.
इन्फो
राजभवनात गेलो पण...
माणिकराव कोकाटे व दिलीप बनकर यांनी ट्विट करून आपण पक्षासोबत असल्याचे खुलासे केले. बनकर यांनी मी राष्टÑवादी कॉँग्रेस पक्ष स्थापनेपासूनच पक्षासोबत असल्याचा निर्वाळा दिला आहे, तर कोकाटे यांनी मी पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात नाही, अजितदादा पवार यांच्या सांगण्यावरून मी राजभवनात गेलो होतो. गटनेते असल्याने आदेश पाळला. तिथे काय होणार आहे याबाबत काहीच माहीत नव्हते; पण मी पक्षासोबत आहे. एकदा घेतलेला निर्णय आपण कदापिही बदलणार नाही, असे ट्विट केले आहे.
सहा जागा जिंकत जिल्ह्याने पुन्हा एकदा शरद पवार यांना पाठबळ दिले होते. शनिवारी (दि.२३) महाराष्टच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडून आली आणि राजभवनात झालेल्या सत्तासंपादनाच्या नाट्याचे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे, निफाडचे आमदार दिलीप बनकर आणि दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ हे स्वत: साक्षीदार बनल्याने जिल्ह्यातील राष्टÑवादीत फूट पडल्याच्या चर्चेला पुष्टी मिळाली. याशिवाय, राष्टÑवादीचे कळवणचे आमदार नितीन पवार आणि देवळालीच्या आमदार सरोज अहिरे हे प्रारंभी नॉट रिचेबल राहिल्याने जिल्ह्यात छगन भुजबळ वगळता पाचही आमदार अजित पवार यांच्या वळचणीला लागल्याचे चित्र निर्माण झाले. मात्र, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत पवार यांनी राष्टÑवादीत परतलेल्या अन्य तीन आमदारांना माध्यमांसमोर उभे केल्यानंतर वातावरण फिरले आणि माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर यांनी ट्विट करून आपण शरद पवार व पक्षासोबतच असल्याचा खुलासा केला, तर नितीन पवार यांनी फेसबुकवरून आपण शरद पवारांसोबत असल्याचे स्पष्ट केले.
कोकाटे अनभिज्ञ
माणिकराव कोकाटे व दिलीप बनकर यांनी ट्विट करून आपण पक्षासोबत असल्याचे खुलासे केले. बनकर यांनी मी राष्टÑवादी कॉँग्रेस पक्ष स्थापनेपासूनच पक्षासोबत असल्याचा निर्वाळा दिला आहे, तर कोकाटे यांनी मी पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात नाही, अजितदादा पवार यांच्या सांगण्यावरून मी राजभवनात गेलो होतो. गटनेते असल्याने आदेश पाळला. तिथे काय होणार आहे याबाबत काहीच माहीत नव्हते; पण मी पक्षासोबत आहे. एकदा घेतलेला निर्णय आपण कदापिही बदलणार नाही, असे ट्विट केले आहे.
अहिरे मुंबईत
देवळालीच्या आमदार सरोज अहिरे या शनिवारी सकाळपर्यंत नाशिकमध्येच होत्या. त्यांच्याशीही अजित पवारांकडून संपर्क साधल्याचे बोलले जाते. परंतु, सत्तानाट्यानंतर सावध झालेल्या राष्टÑवादीने तातडीने सरोज अहिरे यांच्याशी संपर्क साधत त्यांना मुंबईला नेण्यात आले. राष्टवादीच्या मनपातील माजी विरोधी पक्षनेत्या कविता कर्डक त्यांच्यासमवेत आहेत.
पवार, झिरवाळ आणि कोकाटे हे तिघेही मुंबईतील पक्षाच्या शनिवारी (दि. २३) सायंकाळी आयोजित बैठकीसही अनुपस्थित राहिल्याचे दिसून आले. त्यांनी माध्यमांसमोर येण्याचेही टाळले असून, ते संपर्क क्षेत्राबाहेर आहेत. त्यांना दिल्लीला रवाना करण्यात आल्याची चर्चा सोशल माध्यमावर होत आहे.
जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार यांनीही नितीन पवार हे पक्षासोबतच असल्याचे स्पष्ट केले असले तरी ते नेमके कुठे आहेत, याबाबत अनभिज्ञता व्यक्त केली आहे.रात्री उशिरा नितीन पवार यांचे पुत्र ऋषिकेश पवार यांनी पंचवटी पोलीस स्टेशनला आपले वडील हरविल्याची तक्रार दाखल केली आहे. सकाळी मुंबई येथे पक्षाच्या बैठकीसाठी जातो, असे सांगून घरातून निघून गेलेले नितीन पवार पुन्हा घरी परतले नसून, त्यांच्याशी संपर्कही तुटला आहे, असे तक्रारीत म्हटले आहे. झिरवाळ यांच्या कुटुंबीयांनीही ते हरविल्याची तक्रार रात्री उशिरा पोलिसांकडे केली.
दिलीप बनकर यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत आपण पक्षासोबत असल्याचा दावा करताना शरद पवार की अजित पवार यांच्यापैकी कोणासोबत, याचा मात्र उलगडा केला नाही. त्यामुळे त्यांच्या बद्दलचा संशय गडद झाला आहे.
अहिरे यांनीही आपण शरद पवार आणि पक्षासोबतच असल्याचे स्पष्ट केले आहे. सायंकाळी मुंबईत झालेल्या राष्टÑवादीच्या बैठकीला त्यांनी हजेरीही लावली. मात्र, अन्य चार आमदार अनुपस्थित राहिल्याने ते अजित पवारांसोबत आहेत की काय, असा प्रश्न चर्चिला जात आहे.