नितीन पवार यांची गावितांवर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 11:52 PM2019-10-24T23:52:57+5:302019-10-25T00:30:02+5:30

लॉँग मार्चमुळे देशभरात प्रसिध्दीच्या झोतात आलेले माकपाचे आण िराज्यातील जेष्ठ आमदार जे पी गावित यांचा माजीमंत्री स्व ए टी पवारांचे पुत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नितीन पवार यांनी 6596 मतांनी पराभव केला. स्व पवारांच्या 2014 मधील पराभवाचा वचपा काढून माकपच्या लालबावट्याला त्यांनी हद्दपार केले.

 Nitin Pawar defeats the songs | नितीन पवार यांची गावितांवर मात

नितीन पवार यांची गावितांवर मात

googlenewsNext

कळवण : लॉँग मार्चमुळे देशभरात प्रसिध्दीच्या झोतात आलेले माकपाचे आण िराज्यातील जेष्ठ आमदार जे पी गावित यांचा माजीमंत्री स्व ए टी पवारांचे पुत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नितीन पवार यांनी 6596 मतांनी पराभव केला. स्व पवारांच्या 2014 मधील पराभवाचा वचपा काढून माकपच्या लालबावट्याला त्यांनी हद्दपार केले.
7 जिल्हा परिषद गट व 14 पंचायत समतिी गणासह कळवण व सुरगाणा नगरपरिषद कार्यक्षेत्र असलेल्या कळवण विधानसभा मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसला एकतर्फी झालेल्या या निवडणूकीत गेल्या 5 वर्षात ठप्प झालेली विकासकामे, रस्त्यांची दुर्दशा, पाण्याची पळवापळव, जनतेची व नेत्यांची झालेली एकजूट, कांदा निर्यातबंदी व शरद पवार यांच्या भोवती फिरल्याने निकालचे आराखडे बदलले आणि राष्टÑवादीला विजय मिळाला. विद्यमान आमदार जे पी गावीत व राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन पवार यांच्यात खरी दुरंगी लढत झाली. अंतिम टप्प्यात नितीन पवार यांच्या विरोधात जे पी गावितांबरोबर भाजपच्या खासदार डॉ भारती पवार व त्यांचे समर्थक, डॉ जे डी पवार गट सक्रीय झाला होता. तरी राष्टÑवादीला यश लाभले.
पवार यांना स्व ए टी पवारांचा वारसा कामी आला. तर विद्यमान आमदार जे पी गावीत यांच्याकडून 5 वर्षात झालेला भ्रमनिरास अडचणीचा ठरला. पहिल्या फेरीत आमदार जे पी गावित यांनी 3846 मते घेऊन आघाडी घेतली राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन पवारांना 2719 तर युतीच्या मोहन गांगुर्डे - 930 मते मिळाली. 17 व्या फेरीपासून 25 व्या फेरीपर्यंत नितीन पवारांनी आघाडी कायम ठेवत 6596 मतांनी जे पी गावितांचा पराभव केला.
विजयाची तीन कारणे...
1शशिकांत पवार, रवींद्र देवरे, धनंजय पवार, कौतिक पगार, यशवंत गवळी आदिंची मोट बांधून नाराजी दूर करण्यात यश.
2स्व ए टी पवारांच्या कार्यकाळात झालेला विकासाचा मुद्दा प्रभावीपणे मांडण्यात नितीन पवार यशस्वी झाले.
3सुरगाणा तालुक्यात मतविभागणी झाली शिवसेनेच्या मोहन गांगुर्डे यांनी 23052 मते घेऊन जे पी गावितांना घरी बसवले आणि पवारांना यश लाभले.
गावितांच्या पराभवाचे कारण...
पुनंद पाणी पुरवठा योजना रद्द करण्यात व ओतूर धरणाचा प्रलंबित प्रश्न सोडविण्यात 5 वर्षात आलेले अपयश कळवण शहरासह तालुक्यातील रस्त्यांची झालेली दुरावस्था आणि तालुक्यात पाच वर्षात नजरेत भरतील अशी विकासकामे झाली नसल्याने जे पी गावित यांच्यावर कळवण तालुक्यासह विकास यामुद्द्यावर सुरगाणा तालुक्यातील जनतेची असलेल्या नाराजीतून पराभवाचे धनी व्हावे लागले.
पराभूत उमेदवार पक्ष मिळालेली मते
१ जिवा गावित माकप 80281
२ मोहन गांगुर्डे शिवसेना 23052
३ राजेंद्र ठाकरे मनसे 1157
४ विजय भोये भा.ट्रा.पार्टी 806
५ वामन बागुल अपक्ष 753

Web Title:  Nitin Pawar defeats the songs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.