शिक्षण उपसंचालकपदी नितीन उपासनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2020 12:01 AM2020-10-02T00:01:50+5:302020-10-02T01:12:23+5:30
नाशिक: अनेक महिन्यांपासून प्रभारी कार्यभार असलेल्या शिक्षण उपसंचालकपदी नाशिक विभागीय मंडळाचे सचिव नितीन उपासनी यांची शासनाने नियुक्ती केली आहे. येत्या सोमवारी उपासनी हे पदभार स्विकारणार आहेत.
नाशिक: अनेक महिन्यांपासून प्रभारी कार्यभार असलेल्या शिक्षण उपसंचालकपदी नाशिक विभागीय मंडळाचे सचिव नितीन उपासनी यांची शासनाने नियुक्ती केली आहे. येत्या सोमवारी उपासनी हे पदभार स्विकारणार आहेत.
तत्कालीन शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव सेवानिवृत्त झाल्यानंतर अनेकदा या पदावर प्रभारी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मध्यंतरी नितीन बच्छाव यांची उपंसंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र जळगाव येथील प्रकरणामुळे ते वादग्रस्त ठरल्याने त्यांची नगर येथे बदली करण्यात आली. त्यांनंतर उपासनी यंच्याकडे काहीकाळ प्रभारी उपसांचलक पद होते. त्यानंतर त्यांची विभागीय मंडळात नियुक्ती झाली. त्यामुळे माध्यमिक विभागाचा प्रभारी कार्यभार असलेल्या प्रविण पाटील यांच्याकडे उपसंचालक पदाचा प्रभारी कार्यभार देण्यात आला होता. पाटील यांच्याकडे निरंतर शिक्षणाचीही जबादारी आहे. पाटील यांच्यावरही अनेक आरोप असल्याने तेही वादग्रस्त ठरले होते.
शासनाने आता नितीन उपासनी यांची उपसंचालक म्हणून नियुक्ती केली असून ते सोमवारी पदभार स्विकारण्याची शक्यता आहे. जिल्'ात आता प्राथमिक, माध्यमिक, निरंतर शिक्षण आणि उपसंचालक म्हणून पुर्णवेळ अधिकारी मिळाले आहेत.