कमकोच्या अध्यक्षपदी नितीन वालखडे
By admin | Published: February 15, 2017 11:19 PM2017-02-15T23:19:13+5:302017-02-15T23:19:27+5:30
कमकोच्या अध्यक्षपदी नितीन वालखडे
कळवण : दि कळवण मर्चंट को- आॅप. बँकेच्या रिक्त असलेल्या अध्यक्षपदाची सूत्रे विद्यमान उपाध्यक्ष नितीन वालखडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. मंगळवारी सकाळी अकरा वाजता कमकोच्या अध्यक्षपदाची सूत्रे वालखडे यांनी हाती घेतली. कमको बँकेचे अध्यक्ष, ज्येष्ठ संचालक किशोर काशिनाथ वेढणे यांची मार्च २०१६ मध्ये अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी नितीन वालखडे यांची संचालक मंडळाच्या बैठकीत सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली होती. किशोर वेढणे यांनी कमको अध्यक्षपदाचा राजीनामा संचालक मंडळ व सहकार विभागाकडे सादर केल्याने बॅँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत तो मंजूर करण्यात आला.
यावेळी कमको बँकेचे संचालक सुनील महाजन, प्रवीण संचेती, प्रा. निंबा कोठावदे, योगेश मालपुरे, गजानन सोनजे, प्रभाकर विसावे, भारती कोठावदे, शालिनी महाजन, पोपटराव बहिरम, डॉ. धर्मराज मुर्तडक आदि उपस्थित होते.
कमकोची स्थापना सन १९६१ मध्ये कै. एकनाथ जाधव यांच्या पुढाकारातून झाल्यानंतर सन २००४ पर्यंत कमको संचालक व अध्यक्षपदाची धुरा कै. एकनाथ जाधवांनी सांभाळली. त्यांच्या निधनानंतर तब्बल १२ वर्षांनंतर नितीन वालखडेच्या माध्यमातून तेली समाजाला कमकोत प्रतिनिधित्व आणि कमकोचे उपाध्यक्ष व अध्यक्षपद मिळाले. (वार्ताहर)