निवृत्तिनाथ समाधी महापूजा
By admin | Published: January 24, 2017 01:21 AM2017-01-24T01:21:12+5:302017-01-24T01:21:24+5:30
हजारोंची उपस्थिती : वासाळी येथील दांपत्यास प्रथम भाविकाचा मान
त्र्यंबकेश्वर : हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्रीसंत निवृत्तिनाथांच्या संजीवनी समाधीची महापूजा नगराध्यक्ष विजया लढ्ढा व त्यांचे पती दीपक लढ्ढा यांच्या हस्ते करण्यात आली. तत्पूर्वी श्री निवृत्तिनाथ समाधी संस्थानतर्फे करण्यात येणारी महापूजा नाशिक विभागाचे धर्मादाय आयुक्त प्रदीपराव घुगे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी खासदार हेमंत गोडसे यांनीही सपत्नीक श्री निवृत्तिनाथ संजीवन समाधीची महापूजा केली. याप्रसंगी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष संजय घोंगडे, सचिव पवनकुमार भुतडा, माजी अध्यक्ष त्र्यंबकराव गायकवाड, पुंडलिक थेटे, सचिव पवनकुमार भुतडा, माजी अध्यक्ष त्र्यंबकराव गायकवाड, पुंडलिक थेटे, रामभाऊ मुळाणे आदि उपस्थित होते. अचारसंहितेच्या कारणास्तव या महापूजेप्रसंगी भाषणाला फाटा देऊन नगरपालिका व विश्वस्त मंडळातर्फे फक्त सत्कार समारंभ करण्यात आला. निवृत्तीनाथ देवस्थानतर्फे मंदिर जीर्णोद्धार, यात्रेकरूंसाठी मूलभूत सुविधा, दिंड्यांसाठी जागेचा प्रश्न आदिंचा समावेश केंद्र शासनाच्या ‘प्रसाद’ योजनेत करावा अशी अपेक्षा निवृत्तीनाथ विश्वस्थ मंडळातर्फे अध्यक्ष धोंडगे यांनी व्यक्त केली. तसेच शासन निवृत्तीनाथ देवस्थानकडे उदासिनतेने पाहात आहेत. या देवस्थानकडे लक्ष दिले जात नाही. अशी खंत धोंडगे यांनी व्यक्त केली. सिंहस्थ काळात देण्यात येणाऱ्या सुविधा, शेडस् आदि दिलेच नाहीत. म्हणून पंढरपूर आळंदीच्या धर्तीवर येथेही लक्ष द्यावे, अशी मागणी विश्वस्त मंडळाकडून करण्यात आली. यावेळी वारकरी महामंडळाचे ह.भ.प. रामेश्वरशास्त्री, मुख्याधिकारी डॉ. चेतन माकरेकेसरे, माजी उपनगराध्यक्ष संतोष कदम, अभिजीत काण्णव, सुनील अडसरे, अनघा फडके, शामराव गंगापुत्र, जिजाबाई लांडे, धनश्री हरदास, भूषण अडसरे, अलका शिरसाठ, यशोदा अडसरे, सुरेश गंगापुत्र, राजेंद्र शिरसाठ, योगेश (पिंटू) तुंगार, धनंजय तुंगार, माधुरी जोशी, अंजनाताई कडलग, हर्षल भालेराव, उपेंद्र शिखरे, दत्ताजी जोशी, गणपत कोकणे, योगेश गोसावी आदि उपस्थित होते. विश्वस्त मंडळ व त्र्यंबक नगरपरिषदेने केलेल्या महापूजेचे पौरोहित्य देवस्थानचे विश्वस्त जयंत गोसावी व अभिजित काण्णव यांनी केले. (वार्ताहर)