निवृत्तीनाथ महाराज पालखी मार्गाची सुधारणा समाधान देणारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 05:52 PM2019-02-11T17:52:05+5:302019-02-11T17:52:20+5:30

सिन्नर : संत निवृत्तीनाथ महाराज पालखी मार्ग खराब झाल्याने आयोजकांनी मार्ग बदलण्याबाबत सूचना केली होती. मात्र पास्ते गाव त्यातून वगळले जावे ही न पटणारी बाब होती.

Nivruttinath Maharaj recovers reform of the Pathakhi route | निवृत्तीनाथ महाराज पालखी मार्गाची सुधारणा समाधान देणारी

निवृत्तीनाथ महाराज पालखी मार्गाची सुधारणा समाधान देणारी

googlenewsNext

सिन्नर : संत निवृत्तीनाथ महाराज पालखी मार्ग खराब झाल्याने आयोजकांनी मार्ग बदलण्याबाबत सूचना केली होती. मात्र पास्ते गाव त्यातून वगळले जावे ही न पटणारी बाब होती. त्यामुळे आहे तोच मार्ग सुधारण्याचा निर्णय घेतला आणि त्याला यश आले. निवृत्तीनाथ महाराज पालखी मार्गाची सुधारणा होत असल्याने आपल्यासाठी ती समाधानाची बाब असल्याचे प्रतिपादन आमदार राजाभाऊ वाजे यांनी केले.
सिन्नर तालुक्यातील पास्ते येथे हरसुले-पास्ते-मोहदरी, पास्ते-जामगाव रस्ता कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी आमदार वाजे बोलत होते. व्यासपीठावर शिवसेना युवा नेते उदय सांगळे, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी डी. पी. आव्हाड, पंचायत समितीचे सभापती भगवान पथवे, गटनेते संग्राम कातकाडे, उद्योजक हेमंत नाईक, अशोक काकड, सोमनाथ वाघ, गोविंद घुगे, कृष्णनाथ आव्हाड, सरपंच गोरख हांडे, उपसरपंच शरद आव्हाड, नवनाथ घुगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Nivruttinath Maharaj recovers reform of the Pathakhi route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.