निवास पाटील यांना उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार प्रदान
By admin | Published: March 5, 2016 10:12 PM2016-03-05T22:12:49+5:302016-03-05T22:14:56+5:30
निवास पाटील यांना उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार प्रदान
नाशिक : येथील डॉ. निवास पाटील यांना राज्य शासनाचा विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबईतील रवींद्रनाथ नाट्यमंदिरात हा कार्यक्रम झाला. शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. पाटील यांना त्यांच्या ‘शोध देवकणाचा’ या पुस्तकासाठी महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड व मराठी भाषा विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांच्या हस्ते त्यांचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. पाटील हे केटीएचएम महाविद्यालयातील गणित विषयाचे निमंत्रित प्राध्यापक असून, त्यांनी अल्बर्ट आइन्स्टाइनच्या व्यापक सापेक्षतेसंबंधित विषयावर संशोधन केले आहे. तसेच विज्ञानाशी संबंधित त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांना ‘वेध विश्वाचा’ या पुस्तकासाठी राज्य शासनाचा उत्कृष्ट ललित वाङ्मयाचा १९९३-९४ चा प्रथम पुरस्कारही मिळाला आहे.