एनएमसी ई-कनेक्ट अ‍ॅपवर  दोन महिन्यांत साडेपाच हजार तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 12:17 AM2018-05-08T00:17:15+5:302018-05-08T00:17:15+5:30

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जुने ‘स्मार्ट नाशिक’ अ‍ॅप बंद करून दि. १ मार्चपासून नव्याने कार्यान्वित केलेल्या एनएमसी ई-कनेक्ट या मोबाइल अ‍ॅपवर दोन महिन्यांत तब्बल साडेपाच हजार तक्रारींचा पाऊस पडला आहे. अ‍ॅपवर प्राप्त ५५२६ तक्रारींपैकी ५१९४ तक्रारींचा निपटारा झाला असून, ३३२ तक्रारी प्रलंबित आहेत. तक्रारी सोडविण्याचे प्रमाण ९४ टक्के असल्याने अ‍ॅपवर तक्रारी मांडणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढते आहे.

 The NMC e-Connected Approach has reported 2.5PM complaints in two months | एनएमसी ई-कनेक्ट अ‍ॅपवर  दोन महिन्यांत साडेपाच हजार तक्रारी

एनएमसी ई-कनेक्ट अ‍ॅपवर  दोन महिन्यांत साडेपाच हजार तक्रारी

Next

नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जुने ‘स्मार्ट नाशिक’ अ‍ॅप बंद करून दि. १ मार्चपासून नव्याने कार्यान्वित केलेल्या एनएमसी ई-कनेक्ट या मोबाइल अ‍ॅपवर दोन महिन्यांत तब्बल साडेपाच हजार तक्रारींचा पाऊस पडला आहे. अ‍ॅपवर प्राप्त ५५२६ तक्रारींपैकी ५१९४ तक्रारींचा निपटारा झाला असून, ३३२ तक्रारी प्रलंबित आहेत. तक्रारी सोडविण्याचे प्रमाण ९४ टक्के असल्याने अ‍ॅपवर तक्रारी मांडणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढते आहे.
आयुक्तांनी पदभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी नवी मुंबईच्या धर्तीवर एनएमसी ई-कनेक्ट हे मोबाइल अ‍ॅप १ मार्चपासून कार्यान्वित केले. या अ‍ॅपवर तक्रारी केल्यानंतर त्या सोडविण्यासंबंधीचा कालबद्ध कार्यक्रमही त्यांनी आखून दिला. शिवाय धोरणात्मक बाबी वगळता अन्य तक्रारी तत्काळ सोडविण्यावर भर देण्यासंबंधीचे आदेश अधिकारीवर्गाला दिल्याने त्याचा एकूणच चांगला परिणाम दिसून येऊ लागला आहे. आतापर्यंत एनएमसी ई-कनेक्ट या अ‍ॅपवर ५५२६ तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी ५१९४ तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. ३३२ तक्रारी प्रलंबित असून, त्यात अतिक्रमण विभागाच्या सर्वाधिक ८६, विद्युत विभागाच्या ४६, भटके कुत्रे/मलेरिया २६, पाणीपुरवठा २५, बांधकाम विभाग २३, मलनिस्सारण २०, उद्यान १७, नगररचना १५, पावसाळी गटार विभाग १२ या तक्रारींचा समावेश आहे. अ‍ॅपवर सर्वाधिक तक्रारी या विद्युत विभागाच्या ११८१ इतक्या प्राप्त झाल्या आहेत. त्याखालोखाल अतिक्रमण विभाग ७७९, घनकचरा व्यवस्थापन ७६२, पाणीपुरवठा ७०३, बांधकाम विभाग ५५९, भटके कुत्रे/मलेरिया ३९१, उद्यान ३३९, मलनिस्सारण ३१५, पावसाळी गटार १५१, तर नगररचना विभागाच्या ९४ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. आयुक्तांनी या अ‍ॅपवर येणाºया तक्रारी सोडविण्याकडे विशेष लक्ष केंद्रित केले असल्याने आणि आयुक्तांकडून दर सोमवारी खातेप्रमुखांच्या होणाºया बैठकीत आढावा घेतला जात असल्याने तक्रारींचा निपटारा होण्याचे प्रमाण ९४ टक्के आहे. त्यामुळे अ‍ॅपवर तक्रारी करण्याकडेही नागरिकांचा कल वाढत चालला आहे.
अ‍ॅप डाऊनलोडला प्रतिसाद
शहरातील ६८ हजार नागरिकांनी एनएमसी ई-कनेक्ट हे मोबाइल अ‍ॅप डाऊनलोड करून घेतले आहे. यापूर्वी, अस्तित्वात असलेले स्मार्ट नाशिक अ‍ॅप हे ५२ हजार लोकांनी डाऊनलोड करून घेतले होते. आता त्यात नागरिकांची हळूहळू भर पडत चालली आहे. प्रशासनाकडून नगरसेवकांनाही त्यांच्या तक्रारी अ‍ॅपवर मांडण्याचे आवाहन केले जात असल्याने अ‍ॅप हेच आता तक्रार सोडविण्याचे माध्यम बनू पाहत आहे.

Web Title:  The NMC e-Connected Approach has reported 2.5PM complaints in two months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.